शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sad : दिग्गज फुटबॉल प्रशिक्षकाच्या आईचे Corona मुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 11:17 IST

स्पेनमधील कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी पेप यांनी 8 कोटींची मदत केली होती.   

मँचेस्टर सिटीचे मुख्य प्रशिक्षक पेप गॉर्डिओला यांच्या आईचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील ( ईपीएल) क्लबनं ही माहिती दिली. डोलोर्स साला कॅरिओ या बार्सिलोना येथील मानरेसा येथे राहतात आणि त्या 82 वर्षांच्या होत्या. मँचेस्टर सिटीनं म्हटलं की,''क्लबकडून पेप यांच्या आईला श्रंद्धांजली वाहिली जात आहे.''  स्पेनमधील कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी पेप यांनी 8 कोटींची मदत केली होती.     दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे एका खेळाडूवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. कोरोना व्हायरसमुळे त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांना प्राण गमवावे लागले. वडीलांनंतर या खेळाडूच्या आजीनं शनिवारी कोरोना व्हायरसमुळे अखेरचा श्वास घेतला. अँथोनी यार्डे असे या खेळाडूचे नाव आहे. ब्रिटीश बॉक्सर असलेल्या यार्डेनं शनिवारी आजीचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती दिली. कोरोनामुळे मृत्यू झालेली ही कुटुंबातील दुसरी व्यक्ती असल्याचेही त्यानं सांगितलं. गत आठवड्यात यार्डेच्या वडीलांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 

28 वर्षीय यार्डेनं लोकांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यानं लिहिले की,''माझ्या कुटुंबातील दोन सदस्यांना मी गमावले आहे. हा विषाणू घातकी आहे. तरीही लोकं अजूनही बाहेर फिरत आहेत. असं करण्याची गरज नाही. स्वतःच आणि इतरांचं आयुष्य धोक्यात आणू नका. घरीच राहा.'' 

तत्पूर्वी, स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याला वयाच्या २१ व्या वर्षी प्राण गमवावे लागले. त्यानंतर पाकिस्तानचे दिग्गज स्क्वॉशपटू आझम खान यांचा कोरोना व्हायरसमुळे लंडन येथे मृत्यू झाला. लान्सशायर कौंटी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष डेव्हिड हॉजकिस यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. ते 71 वर्षांचे होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFootballफुटबॉल