शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन : ई-गॅझेटचा मोह टाळू चला मैदानावर फुटबॅाल खेळू - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 19:36 IST

भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात उदया म्हणजेच 15 सप्टेंबरला एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.

मुंबई, दि. 14  - भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात उदया म्हणजेच 15 सप्टेंबरला एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. उद्या सकाळी 9.30 वाजता मुंबई जिमखाना, फोर्ट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन' या फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.  

उदया दिनांक 15 सप्टेंबर रोजी या दिवशी बॉम्बे जिमखाना येथे आठ वेगवेगळे सामने होणार आहेत. मुंबई जिमखाना येथे मुलींचा संघ, मुलांचा संघ, मुंबईचे डबेवाले, क्रीडा पत्रकार विरुद्ध राजकीय पत्रकार, नॅशनल ब्लाईंड असोसिएकशन विद्यार्थी, पालघर येथील आदिवासी संघ असे फुटबॉलचे सामने खेळले जाणार आहेत. मुंबई शहरात सुमारे जवळपास तीन लाखांहून अधिक मुले-मुली विविध ठिकाणी फुटबॉल खेळणार असून शाळा-महाविद्यालयांमधील मैदानांव्यतिरिक्त सुमारे200 मैदानांची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे उदया दिवसभर राज्यभरात दिवसभर मुले मुली फुटबॉल  खेळताना दिसतील.

राज्यातील सर्व शाळांमध्ये येत्या 15 सप्टेंबर रोजी फुटबॉल खेळून महाराष्ट्रात फुटबॉल मिशन एक मिलियनच्या निमित्ताने महाराष्ट्र फुटबॉलमय होणार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फिफा अंडर 17 विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने (FIFA U-17 World Cup India 2017)  देशात 1कोटी 10 लाख लोकांनी फुटबॉल खेळावे अशी कल्पना मांडली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी 'महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन' ची घोषणा केली आहे. या घोषणेअंतर्गत उदया म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी राज्यभर 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी, युवक फुटबॉल खेळणार आहेत. अशा प्रकारचा अभिनव कार्यक्रम योजणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.

मुलांनी इ-गॅझेट पासून दूर राहावे आणि मैदानावर येवून फुटबॉल खेळाचा आनंद लुटावा हा या उपक्रमामागे प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी मुलांनी अधिक वेळ मैदानावर द्यावा यासाठीच फुटबॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर  शिक्षण विभागाने 15 सप्टेंबर हा दिवस Non-Instructional Day दिला असल्यामुळे मोठया प्रमाणावर विद्यार्थी मैदानावर खेळायला किंवा खेळ पाहायला उपस्थित राहतील. मुंबईतील सुमारे २०० मैदांनावर फुटबॉलचे सामने खेळले जाणार असून त्यापैकी निवडक ठिकाणांची यादी खालीलप्रमाणे –

१.      ओव्हल मैदान

२.      क्रॉस मैदान

३.      मुंबई जिमखाना

४.      आझाद मैदान

५.      पोलीस जिमखाना, मरिन ड्राईव्ह

६.      पारशी जिमखाना, मरिन ड्राईव्ह

७.      इस्लाम जिमखाना, मरिन ड्राईव्ह

८.      विल्सन जिमखाना, मरिन ड्राईव्ह

९.      शिवाजी पार्क, दादर

१०.  कुपरेज मैदान

११.  गोवन्स स्पोर्टींग क्लब

१२.  कर्नाटक स्पोर्टींग क्लब

१३.  मुंबई स्कूल स्पोर्टस असोसिएशन

१४.  शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा

१५.  नायगांव पोलीस मैदान, नायगांव (फुटबॉल)

१६.  मुंबई विद्यापीठ, मरिन लाईन्स

१७.  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, एलफिन्स्टन

१८.  जिल्हा क्रीडा संकुल, धारावी

१९.  प्रियदर्शनी पार्क, मलबार हिल

२०.  वरळी स्पोर्टस क्लब, वरळी

२१.  एम.डी.एफ.ए.सेंट झेविअर्स मैदान, परेल पू.

टॅग्स :Sportsक्रीडाVinod Tawdeविनोद तावडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस