शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

फ्रान्सची नजर दुसऱ्या विश्वविजेतेपदावर, स्टार खेळाडूंवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 04:02 IST

युवा खेळाडूंचा समावेश असलेला फ्रान्स संघ आपल्या स्टार किलियान एमबाप्पे व एंटोइन ग्रिजमान यांच्या कामगिरीच्या जोरावर रविवारी खेळल्या जाणा-या २०१८ विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये क्रोएशियाचा पराभव करीत दुस-यांदा हा प्रतिष्ठेचा चषक उंचावण्यास प्रयत्नशील आहे.

मॉस्को : युवा खेळाडूंचा समावेश असलेला फ्रान्स संघ आपल्या स्टार किलियान एमबाप्पे व एंटोइन ग्रिजमान यांच्या कामगिरीच्या जोरावर रविवारी खेळल्या जाणा-या २०१८ विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये क्रोएशियाचा पराभव करीत दुस-यांदा हा प्रतिष्ठेचा चषक उंचावण्यास प्रयत्नशील आहे. दरम्यान, चार आठवड्यांपूर्वी ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळी या अंतिम लढतीची कल्पना मोजक्याच लोकांनी केली असेल.लियोनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो व नेमार यांच्यासारखे स्टार खेळाडू मायदेशी परतले आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर पारंपरिक रुपाने बलाढ्य संघ जर्मनी, ब्राझील व अर्जेंटिना या संघांचे आव्हानही अपेक्षेपेक्षा लवकर संपुष्टात आले.फ्रान्सचा संघ स्पर्धेतील दुसरा सर्वांत युवा संघ आहे. त्यात वेगवान एमबाप्पेची उपस्थिती प्रेरणादायी ठरली आहे. एमबाप्पेचा धडाका रोखण्याचे मुख्य आव्हान क्रोएशियापुढे असेल. एमबाप्पे आणि पॉल पोग्बा या स्टार खेळाडूंच्या वेगवान चाली त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतात. क्रोएशिया संघ लुका मॉडरिचमुळे प्रेरित आहे. सध्या जगातील सर्वोत्तम मिडफिल्डरमध्ये त्याचा समावेश होतो.दरम्यान, काही क्रीडा समीक्षक मात्र अंतिम लढत बलाढ्य संघांदरम्यान होत नसल्यामुळे निराश झाले असतील. यात कुठलाही दक्षिण अमेरिकन संघ नाही. स्पेनने २०१० मध्ये नेदरलँडचा पराभव करीत जेतेपद पटकावल्यानंतर दुसºयांदा असे घडले की, ब्राझील, जर्मनी, इटली किंवा अर्जेंटिना यांच्यासारखे बलाढ्य संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरले. पण, ही विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत असून फ्रान्सकडे १९९८ नंतर दुसºयांदा जेतेपद पटकावत अर्जेंटिना व उरुग्वे यांच्या पंक्तीत स्थान मिळवण्याची संधी आहे. यापूर्वी, फ्रान्सने जेतेपद पटकावले होते त्यावेळी डिडिएर डेस्चॅम्प्स संघाचे कर्णधार होते आता ते संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे खेळाडू व व्यवस्थापक म्हणून जेतेपद पटकावणारे तिसरे खेळाडू ठरण्याची संधी आहे आणि मारियो जागालो व फ्रांज बॅकेनबॉर यांच्या यादीत स्थान मिळवू शकतात. (वृत्तसंस्था)क्रोएशियाने गटातील सर्व तिन्ही सामने जिंकले. त्यात अर्जेंटिनाला पराभूत केल्यानंतर डेन्मार्क व रशिया संघांचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडवर अतिरिक्त वेळेत मात केली.ज्लाटको डालिचच्या संघासाठी हा प्रवास आव्हानात्मक होता. आता संघाला पुन्हा एकदा प्रेरणा घेत अंतिम लढतीत सरशी साधावी लागेल.डालिच म्हणाले,‘आम्ही खडतर प्रवास केला आहे. जीवनातील ही एकमेव संधी आहे. आमच्यासाठी सर्वंच कठीण होते, पण आम्हाला चमकदार कामगिरीचा विश्वास आहे.’जगातील बरेच चाहते आम्हाला पाठिंबा देतील, असा क्रोएशिया संघाला विश्वास आहे. इव्हान राकितिच म्हणाला,‘लाखो चाहते आमच्या विजयासाठी प्रार्थना करतील.’फ्रान्सचा निम्मा संघ आता बदलेला आहे, पण एमबाप्पे आपल्या आक्रमक कामगिरीमुळे स्टार झालेला आहे. त्याने अंतिम १६ मध्ये अर्जेंटिनाविरुद्ध ४-३ ने मिळवलेल्या विजयात मैदानावर आक्रमक कामगिरी करीत सर्वांच्या हृदयात स्थान मिळवले. पण, याव्यतिरिक्त फ्रान्सने डेस्चॅम्प्सचा संघ म्हणून शानदार खेळ केला आहे. त्यांचा जोर बचावावर होता.फ्रान्सने साखळी फेरीत आॅस्ट्रेलिया व पेरू यांचा पराभव केला तर डेन्मार्कविरुद्ध गोलशून्यने बरोबरी राखली. स्पर्धेतील हा एकमेव गोलशून्य अनिर्णीत निकाल ठरला. यानंतर फ्रान्स संघ अर्जेंटिना, उरुग्वे व बेल्जियमविरुद्ध मजबूत भासला. फ्रान्स फायनलमध्ये प्रबळ दावेदार आहे.ही लढत म्हणून १९९८ च्या उपांत्य लढतीची पृनरावृत्ती आहे. त्यावेळी लिलियान थुर्रामने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर फ्रान्सने क्रोएशियाचा २-१ ने पराभव केला होता.2006 च्या अंतिम लढतीत त्यांना इटलीकडून पेनल्टीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. युरो २०१६ च्या अंतिम लढतीत यजमान पोर्तुगालविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांची भूक आणखी वाढली.>फ्रान्ससाखळी फेरीवि.वि. आॅस्टेÑलिया २-१वि.वि. पुरु १-०अनिर्णित वि. डेन्मार्क ०-०उप-उपांत्यपूर्व फेरीवि.वि. अर्जेंटिना ४-३उपांत्यपूर्व फेरीवि.वि. उरुग्वे २-०.उपांत्य फेरीवि.वि. बेल्जियम १-०.>क्रोएशियासाखळी फेरी...वि.वि. नायजेरिया २-०वि.वि. अर्जेंटिना ३-०वि.वि. आइसलँड २-१उप-उपांत्यपूर्व फेरीवि.वि. डेन्मार्क ३-२ (पेनल्टी शूटआऊट)उपांत्यपूर्व फेरीवि.वि. रशिया ४-३ (पेनल्टी शूटआऊट्आ)उपांत्य फेरीवि.वि. इंग्लंड २-१

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८russiaरशिया