जगातील महान फुटबॉलपटूलिओनेल मेस्सी त्याच्या बहुचर्चित 'GOAT इंडिया टूर २०२५' च्या अंतिम टप्प्यासाठी आज, १५ डिसेंबर, नवी दिल्लीत दाखल झाला आहे. कोलकाता आणि हैदराबाद येथील उत्साहानंतर, आता दिल्लीत मेस्सीला भेटण्यासाठी कॉर्पोरेट आणि उच्चभ्रू वर्गात जबरदस्त चढाओढ पाहायला मिळत आहे. या दौऱ्यादरम्यान मेस्सीसोबत केवळ हस्तांदोलन आणि फोटो काढण्यासाठी काही बड्या कंपन्यांनी तब्बल १ कोटी रुपयांपर्यंत रक्कम मोजल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मेस्सीच्या दिल्ली भेटीसाठी अभेद्य सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मेस्सी आणि त्याचा चमू चाणक्यपुरी येथील 'द लीला पॅलेस' या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला आहे. त्यांच्यासाठी हॉटेलचा संपूर्ण एक मजला आरक्षित करण्यात आला आहे.
हॉटेलमध्ये निवडक व्हीआयपी आणि कॉर्पोरेट पाहुण्यांसाठी खास 'मीट अँड ग्रीट' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, या खासगी कार्यक्रमात मेस्सीला भेटण्याची संधी मिळवण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी १ कोटी रुपयांपर्यंत खर्च केला आहे.
अखेरचा थांबा दिल्ली...
मेस्सीच्या या तीन दिवसीय भारत दौऱ्यात (कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली) दिल्ली हे शेवटचे ठिकाण आहे. येथील व्यस्त कार्यक्रमांमध्ये मेस्सीची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही भेट होणार आहे. मेस्सी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी देखील जाणार आहे. पटेल हे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अनेक वर्षे अध्यक्ष देखील होते.
एका सामान्य चाहत्यासाठी मेस्सीच्या जाहीर कार्यक्रमाचे तिकीट सुमारे रु. ४,७२० पासून सुरू होते, तर मुंबई-दिल्ली येथे 'मीट अँड ग्रीट'चे सामान्य पॅकेज सुमारे १० लाख रुपयांमध्ये उपलब्ध होते.
Web Summary : Lionel Messi's India tour culminates in Delhi, with companies paying crores for a handshake. He'll meet PM Modi and Praful Patel. Tickets start at ₹4,720.
Web Summary : लियोनेल मेस्सी का भारत दौरा दिल्ली में समाप्त, कंपनियों ने हाथ मिलाने के लिए करोड़ों का भुगतान किया। वह पीएम मोदी और प्रफुल्ल पटेल से मिलेंगे। टिकट ₹4,720 से शुरू।