शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लिओनेल मेस्सीसोबत 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच 'असं' घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 10:02 IST

अर्जेंटिना व बार्सिलोना क्लबचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या बाबतीत बारा वर्षांत न घडलेली घटना मंगळवारी घडली. सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी फिफाने जाहीर केलेल्या अव्वल तीन खेळाडूंत मेस्सीला स्थान मिळालेले नाही.

माद्रिद: अर्जेंटिना व बार्सिलोना क्लबचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या बाबतीत बारा वर्षांत न घडलेली घटना मंगळवारी घडली. सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी फिफाने जाहीर केलेल्या अव्वल तीन खेळाडूंत मेस्सीला स्थान मिळालेले नाही. मेस्सी २००६नंतर प्रथमच या पुरस्काराच्या अव्वल तीन नामांकनात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. मेस्सी चाहत्यांमध्ये या निर्णयावर प्रचंड नाराजी पसरली आहे. 

या पुरस्कारासाठी ख्रिस्तीयानो रोनाल्डो ( पोर्तुगाल व युव्हेंटस), ल्युका मॉड्रीच ( क्रोएशिया व रेयाल माद्रिद) आणि मोहम्मद सलाह ( इजिप्त व लिव्हरपूल) यांच्यात चुरस रंगणार आहे. युरोपियन महासंघाच्या सर्वोत्तम युरोपियन खेळाडूचा पुरस्कार मॉड्रीचने पटकावला होता. त्याही पुरस्कारासाठी मेस्सीला अव्वल तिंघात स्थान मिळाले नव्हते. रोनाल्डो, मॉड्रीच आणि सलाह यांच्यातील चढाओढीत क्रोएशियाच्या कर्णधाराने बाजी मारली होती.  मॉड्रीच आणि सलाह यांना प्रथमच या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. क्रोएशियाला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देणाऱ्या मॉड्रीचला गोल्डन बुट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय त्याने युरोपातील सर्वोत्तम खेळाडूचा मानही पटकावला. त्यामुळे फिफाच्या या पुरस्कारासाठी त्याचे पारडे जड मानले जात आहे.  सर्वोत्तम खेळाडूंच्या अव्वल दहा नामांकनात मेस्सीसह केव्हीन डी ब्रुयने, राफेल व्हॅरने, अँटोनिए ग्रिझमन, ईडन हॅझार्ड, हॅरी केन आणि कायलिय मॅबाप्पे यांचा समावेश होता. मेस्सीने 2017-18च्या हंगामात 44 गोल करताना बार्सिलोना क्लबला ला लिगा आणि कोपा डेल रे स्पर्धेचे जेतेपद जिंकून दिले होते. मात्र, विश्वचषक स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला बाद फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता.   फिफा पुरस्कार विजेत्यांची घोषणा 24 सप्टेंबरला लंडन येथे केली जाणार आहे. 

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉल