लंडन : इंग्लिश प्रीमिअर लीगमधील लिस्टर सिटी या फुटबॉल क्लबचे मालक विचाई श्रीवद्धानाप्रभा यांचा सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला. येथील किंग पॉवर स्टेडियमबाहेर त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि त्यात विचाईंसह पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. लिस्टर सिटी क्लबने या वृत्ताला दुजोरा दिला. चालकाचा हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.
लिस्टर सिटी फुटबॉल क्लब मालकांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 09:19 IST