शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

इंटरकॉन्टिनेंटल कप : भारत-केनिया फुटबॉल लढत आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 05:47 IST

इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये केनियाविरुद्धच्या लढतीत सर्वांची नजर भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीवर राहील. तो आपल्या कारकिर्दीतील १०० वा आंतरराष्ट्रीय सामना संस्मरणीय करण्यास प्रयत्नशील असेल.

मुंबई : इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये केनियाविरुद्धच्या लढतीत सर्वांची नजर भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीवर राहील. तो आपल्या कारकिर्दीतील १०० वा आंतरराष्ट्रीय सामना संस्मरणीय करण्यास प्रयत्नशील असेल.या स्ट्रायकरने आतापर्यंत ५९ गोल नोंदवले असून, भारतातर्फे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. मुंबई फुटबॉल परिसरातील आणखी एक विजय स्थानिक संघाला स्पर्धेत अंतिम फेरीत दाखल होण्यास पुरेसा ठरेल. या स्पर्धेचे आयोजन पुढील वर्षी होणाऱ्या आशिया कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून करण्यात आले आहे.भारताने स्पर्धेच्या सलामी लढतीत चिनी तैपेईचा ५-० ने पराभव केला. छेत्री शानदार फॉर्मात आहे. त्याने या लढतीत हॅट््ट्रिक नोंदवली. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये त्याने तिसºयांदा हा पराभव केला. शारीरिकदृष्ट्या कणखर आणि आक्रमक आफ्रिकी संघाविरुद्धही छेत्री अशाच प्रकारची कामगिरी करण्यास इच्छुक आहे.छेत्री व त्याचा सहकारी स्ट्रायकर जेजे लालपेखलुवा यांनी फॉर्मात असेल, तर कुठलाही बचाव सहजपणे भेदण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे. भारतीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेन्टाईन यांच्याकडे आघाडीच्या फळीत बलवंत सिंगच्या रूपानेपर्याय उपलब्ध आहे आणि सामन्याची स्थिती बघता त्याच्या नावावर विचार होऊ शकतो.छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारताच्या आघाडीच्या फळीने या लढतीतही आक्रमक खेळ केला, तर केनियाच्या बचाव फळीला कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. भारतीय संघात उदांता सिंग, अनिरुद्ध थापा आणि प्रणय हलदर यांच्या रूपाने आक्रमक मिडफिल्डर आहेत. या खेळाडूंची गेल्या लढतीतील कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. उदांता व प्रणय यांनी चिनी तैपेईविरुद्ध गोल नोंदवले होते.केनियाविरुद्ध सोमवारच्या लढतीतही त्यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. भारताची बचावफळीही मजबूत आहे. त्यात अनुभवी संदेश झिंगन व प्रीतम कोटल बॅकलाइनची जबाबदारी सांभाळत आहेत. नारायण दास व सुभाशिष बोस यांच्यासारख्या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे भारतीय संघ मजबूत भासत आहे. गोलकिपर गुरप्रीतसिंग संधू शानदार असून सोमवारच्या लढतीत त्याला महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे.कॉन्स्टेन्टाईन गेल्या लढतीत संघाने वर्चस्व गाजवल्यामुळे खूष होते; पण त्याचसोबत त्यांनी आत्ममश्गूल न राहण्याचा इशारा दिला आहे. भारतीय संघ मानांकनामध्ये वरच्या क्रमांकावर असून, त्यांना येथील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. केनियन संघ छेत्री अ‍ॅन्ड कंपनीची आगेकूच रोखण्यास प्रयत्नशील आहे. त्यांचे प्रशिक्षक सेबेस्टियन मिंगे यांनी भारतीय संघ शानदार असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)आशिया कप स्पर्धेत छेत्री महत्त्वाची भूमिका बजावेल : भूतियाकरिश्माई स्ट्रायकर सुनील छेत्री २०१९ च्या आशियाई कपमध्ये भारतीय संघातर्फे महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास भारताचा माजी कर्णधार बाईचुंग भूतियाने व्यक्त केला. छेत्री सोमवारी इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेत केनियाविरुद्ध कारकिर्दीतील १०० वा सामना खेळणार आहे. त्याने चिनी ताईपेविरुद्ध हॅट््ट्रिक नोंदवली होती. आपल्या देशातर्फे १०० सामने खेळणे मोठी उपलब्धी आहे. मी या एलिट क्लबमध्ये त्याचे स्वागत करणार आहे. मी आतापर्यंत बघितलेल्या खेळाडूंमध्ये तो सर्वात गंभीर व मेहनती फुटबॉलपटूंपैकी एक आहे.गेल्या वेळच्या तुलनेत आशिया कपमध्ये यावेळी आपला ड्रॉ थोडा सोपा आहे.भारताविरुद्धची लढत कठीण : केनियन प्रशिक्षककेनियाने इंटरकॉन्टिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात न्यूझीलंडविरुद्ध २-१ ने विजय मिळवत केली; पण मुख्य प्रशिक्षक सेबेस्टिनय मिग्ने यांच्या मते यजमान भारताविरुद्धची लढत कठीण आहे. आम्हाला विजयाचा आनंद आहे. आमच्या खेळाडूंसाठी नव्या खंडात व नव्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळण्याचा अनुभव चांगला ठरला. आमच्यासाठी संघाचा समतोल साधणे कठीण आहे. कारण अनेक खेळाडू निवडीसाठी उपलब्ध नाहीत. दुसºया हाफमध्ये गोल नोंदविण्यात यश आल्यामुळे आम्ही नशिबवान ठरलो. या विजयामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला. भारताने सलामी लढतीत तैपेईचा ५-० ने पराभव केला.त्यात कर्णधार सुनील छेत्रीने हॅट््ट्रिक लगावली. भारताविरुद्धची लढत कठिण राहील.आम्हाला केवळ दोन दिवसांचा अवधी मिळाला, पण आम्ही सकारात्मक विचाराने लढतीत सहभागी होऊ. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. भारताचे आव्हान कठिण आहे, पण उंचावलेल्या मनोधैर्यासह खेळल्यास निकाल काहीही लागू शकतो.’ (वृत्तसंस्था)भारतीय संघगोलकिपर : गुरप्रीतसिंग संधू , अमरिंदर सिंग, विशाल केथ.डिफेंडर : प्रीतम कोटल, अनास एडाथोडिका, सलाम रंजन सिंग, संदेश झिंगन, लालरुआथारा, नारायण दास, जेरी लालरिंजुआला, सुभाशिष बोस. मिडफिल्डर : उदांता सिंग, आशिक कुरुनियान, रौलिन बोर्जेस, अनिरुद्ध थापा, प्रणय हलदर, मोहम्मद रफीक, हलीचरण नारजारी, लालदानमाविया राल्टे.फॉरवर्ड : सुनील छेत्री, जेजे लालपेखलुआ, बलवंत सिंग आणि एलेन देवरी.सामना : भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजतापासून.

टॅग्स :Footballफुटबॉल