शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघाला ‘एक्पोजर ट्रीप’ची गरज; माजी गोलरक्षक ब्रम्हानंद शंखवाळकर यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 19:20 IST

एएफसी चषकात भारतीय फुटबॉल संघाने केलेली कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीय फुटबॉलचा स्तरही उंचावत आहे. परंतु, भारताने केवळ पाकिस्तान, श्रीलंका, मालदिव, बांगलादेश या आशियाई देशांबरोबर खेळून चालणार नाही.

- सचिन कोरडे

पणजी - एएफसी चषकात भारतीयफुटबॉल संघाने केलेली कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीयफुटबॉलचा स्तरही उंचावत आहे. परंतु, भारताने केवळ पाकिस्तान, श्रीलंका, मालदिव, बांगलादेश या आशियाई देशांबरोबर खेळून चालणार नाही. त्यांना ‘एक्स्पोजर ट्रीप’ची गरज आहे. जपान, कोरिया, कतार आणि युएई अशा देशांसोबत भारतीय संघाचे अधिक सामने व्हायला हवेत, असे मत भारताचे माजी गोलरक्षक तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त ब्रम्हानंद शंखावाळकर यांनी व्यक्त केले.पणजीतील स्पोटर््स अ‍ॅण्ड वेलनेस स्पाच्या उद्घाटन प्रसंगी ब्रम्हानंद प्रमुख पाहुणे म्हणून आले होते तेव्हा त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला. ते म्हणाले भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करीत आहे. खेळाडूंचा स्तरही उंचावला आहे. विदेशातील प्रशिक्षणाचा त्यांना फायदा झालेला आहे. परंतु, भारतीय संघाला दुसºया खंडातील देशांविरुद्ध खेळायला हवे.   आपण केवळ त्याच त्या संघाविरुद्ध खेळून चालणार नाही. त्याचा विरोधी संघांना फायदा होईल, आपणास नाही.भारतीय कर्णधार सुनील छेत्री आणि स्पेनचा लियोनेल मेस्सी या दोघांमध्ये तुलना करणे योग्य नाही. सुनील हा निश्चितपणे गुणवान भारताचा नंबर वन खेळाडू आहे.  त्याचा मी आदर करतो पण मेस्सीसोबत त्याची तुलना करणे योग्य नाही. स्पॅनिश फुटबॉलचा दर्जा आणि स्तर खूप उंचीवर आहे. त्याची भारतीय फुटबॉलसोबत तुलना करणे योग्य होणार नाही. सुनील इंग्लंड, पोतुगाल आणि अमेरिकेच्या ब स्तरावरील क्लबकडून खेळला तर त्याला पाच-सहा गोल नोंदवता येणार नाहीत. त्यांचा स्तर फार वेगळा आहे. आय-लीगचे विलिनीकरण अशक्यआय-लीगचे आयएसलमध्ये विलिनीकरण करण्याची गोष्ट पुढे आली होती. मात्र ती प्रत्यक्षात होणार नाही. आय-लीगचा फार्मेट आणि आयएसलएलच्या वेगळा आहे. आयलीगला प्रेक्षकांची गर्दी कमी असते हे मान्य जरी असले तरी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला विलिनीकरण करणे अशक्य असे आहे. प्रशिक्षकांवर ‘नो कोमेंट’भारतीय प्रशिक्षक स्टेफन कॉस्टटाईन यांनी राजीनामा दिला. हा राजीनामा एआयएफएफने अजून मंजूर केलेला नाही. एएफसी चषकात भारतीय संघ बहरिनकडून पराभूत झाला. हा पराभव भारतीय प्रशिक्षकांना पचवता आला नाही. या प्रदर्शनावर नाराज होत कॉस्टटाईन यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यावर ब्रम्हानंद यांनी बोलणे टाळले.  त्यानी पदावर राहावे किंवा नाही हा निर्णय त्यांचा आहे. असे ब्रम्हानंद म्हणाले.   आयएसलमधील भारतीय खेळाडूंना राष्ट्रीय संघात अजूनही संधी मिळत नाही? याबाबत विचारले असता ते म्हणाले की, भारतीय संघ हा केवळ पाच-सहा जणांचा नसतो. या संघाची निवड फेडरेशनही करीत नाही किंवा मॅनेजमेंटही करीत नाही. प्रशिक्षकावरही ही जबाबदारी असते. तोच संघ निवडतो. त्याच्या नजरेत जो खेळाडू योग्य असेल त्याला संधी मिळते.

टॅग्स :IndiaभारतFootballफुटबॉल