शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय कुमार फुटबॉलपटूंची विजयी घोडदौड कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 09:09 IST

आशियाई विजेत्या इराकला नमवून इतिहास घडवणाऱ्या भारताच्या कुमार संघाने बुधवारी बलाढ्य येमेनचाही धुव्वा उडवला.

जॉर्डन - आशियाई विजेत्या इराकला नमवून इतिहास घडवणाऱ्या भारताच्या कुमार संघाने बुधवारी बलाढ्य येमेनचाही धुव्वा उडवला. भारताने पाच देशांच्या वेस्टर्न आशिया फुटबॉल फेडरेशन  ( १६ वर्षांखालील) स्पर्धेतील अखेरच्या लढतीत येमेनवर ३-० अशा फरकाने विजय मिळवला. 

सेंट्रल डिफेंडर हरप्रीत सिंगने ३७ व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन मिनिटांत भारताकडून दुसरा गोल झाला आणि येमेनने हार मान्य केली. रिड डिमेलोने दुसरा गोल केला. ४७ व्या मिनिटाला रोहित दानूने तिसरा गोल नोंदवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत भारताने तीन विजय मिळवले, तर जपानकडून त्यांना थोडक्यात पराभव पत्करावा लागला. भारताने आशियाई विजेत्या इराकसह यजमान जॉर्डनला नमवले. संघाचे मुख्य प्रशिक्षक बिबियानो फर्नांडिस म्हणाले, की' खेळाडूंचा अभिमान वाटतो. त्यांनी आज अपेक्षेपेक्षा अधिक चांगला खेळ केला. या दौऱ्यातील अनुभवाचा खेळाडूना पुढील वाटचालीसाठी नक्की फायदा होईल.' 

मलेशियात होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेची पूर्वतयारीसाठी भारतीय फुटबॉल महासंघाने या दौऱ्याचे आयोजन केले होते. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतासमोर ' C' गटात इराण, व्हिएतनाम आणि इंडोनेशियाचे आव्हान आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या चार संघाना २०१९ च्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. 

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतSportsक्रीडा