शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

रंगतदार उपांत्य लढतीची आशा, आज फ्रान्स - बेल्जियम भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 5:09 AM

फ्रान्स आणि बेल्जियम संघांच्या स्टार स्ट्रायकर्सच्या उपस्थितीमुळे उभय संघांदरम्यान मंगळवारी रंगणाऱ्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या लढतीत चाहत्यांना गोलचा पाऊस अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.

सेंट पीटर्सबर्ग : फ्रान्स आणि बेल्जियम संघांच्या स्टार स्ट्रायकर्सच्या उपस्थितीमुळे उभय संघांदरम्यान मंगळवारी रंगणाऱ्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या लढतीत चाहत्यांना गोलचा पाऊस अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.हे युरोपीयन शेजारी आणि प्रतिस्पर्धी यापूर्वी विश्वकप स्पर्धेत आपसांत खेळले त्यावेळी फ्रान्सने १९८६ मध्ये तिसºया स्थानाच्या लढतीत बेल्जियमचा ४-२ ने पराभव केला होता.उभय संघांदरम्यान तीन वर्षांपूर्वी स्टेड डी फ्रान्समध्ये खेळल्या गेलेल्या मैत्रीपूर्ण लढतीत बेल्जियमने ४-३ ने सरशी साधली होती.विश्वकप २००२ च्या पूर्वसंध्येला फ्रान्सला ज्यावेळी मैत्रीपूर्ण लढतीत बेल्जियमविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता त्यावेळी राष्ट्रीय स्टेडियममध्ये यजमान देशाच्या खेळाडूंची हुटिंग करण्यात आली होती. फ्रान्स मात्र सध्या सुरू असलेल्या विश्वकप स्पर्धेत सर्वांत युवा संघाच्या जोरावर २००६ नंतर प्रथमच विश्वकप उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. संघाच्या या वाटचालीमध्ये १९ वर्षीय फॉरवर्ड काइलियान एमबापेची भूमिका महत्त्वाची ठरली आहे तर बेंजामिन पेवार्ड व लुकास हर्नांडेजच्या अनुभवहीन आक्रमक फुलबॅक जोडीनेही शानदार कामगिरी केली आहे.१९९८ मध्ये फ्रान्सच्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार व सध्या संघाचे प्रशिक्षक असलेले दिदिएर डेसचॅम्प्स यांनी उजव्याबाजूने पेवार्ड व डाव्या बाजूने हर्नांडेजला खेळविण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.२२ वर्षीय या दोन्ही खेळाडूंना केवळ प्रत्येकी १०-१० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे, पण सध्या सुरू असलेल्या विश्वकप स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंनी शानदार खेळ केला आहे. दुसºया बाजूचा विचार करता सुरुवातीला प्रशिक्षक रोबर्टो मार्टिनेज बेल्जियमच्या वैयक्तिक प्रतिभेला सामूहिक स्वरूप देण्यात यशस्वी ठरतात किंवा नाही, याबाबत साशंकता होती. आॅगस्ट २०१६ मध्ये ते संघासोबत जुळले त्यावेळी चाहत्यांनी अधिक महत्त्व दिले नव्हते. कारण काही दिवासांपूर्वीच इंग्लंड प्रीमिअर लीगचा संघ एव्हर्टनने त्यांना निलंबित केले होते.मार्टिनेजच्या कार्यकाळाची सुरुवात स्पेनविरुद्ध गृहमैदानावर ०-२ ने पराभवाने झाली, पण त्यानंतर बेल्जियम २४ सामन्यांत अपराजित आहे. या कालावधीत त्यांनी ७८ गोल नोंदवले. संघाला केवळ एका लढतीमध्ये गोल नोंदविता आला नाही. फ्रान्सचे माजी स्ट्रायकर थियेरी हेन्री बेल्जियमचे सहायक प्रशिक्षक आहेत आणि संघ सध्याच्या विश्वकप स्पर्धेत पाच सामन्यांत १४ गोल करीत गोल नोंदवण्याच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर आहे. जपानविरुद्ध अंतिम १६ च्या लढतीत संघ ०-२ ने पिछाडीवर असताना मार्टिनेजने मारुआने फेलाईनी व नासेर चाडली या दोघांना मैदानावर उतरविले.या दोघांनी गोल नोंदवित संघाला३-२ ने विजय मिळवूनदिला. (वृत्तसंस्था)1सामन्यादरम्यान सर्वांची नजर बेल्जियमचा गोलकिपर थिबाऊट कोर्टोइस व फ्रान्सचा ह्युगो लारिस यांच्यावर राहील. फ्रान्स व टोटेनहॅमतर्फे चुका करण्यासाठी गेल्या एक वर्षात लारिस टीकेचे लक्ष्य ठरला आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध संघाच्या सलामी लढतीत त्याने एक फटका सोडण्याचा निर्णय घेतला, पण चेंडू क्रॉसबारला लागल्यामुळे संघाने सुटकेचा श्वास सोडला. उरुग्वेविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत लारिस शानदार फॉर्मात दिसला. त्याने काही चांगले बचाव केले. व्हिन्सेट कोंपानी, यान वर्टोनगेन व फेलाईनी यांच्या रुपाने बेल्जियम संघाकडे उंच चणीचे डिफेंडर आहेत. ते हेडर लगावण्यात सक्षम आहेत.2कोर्टोईसने स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. ब्राझीलविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत त्याने प्रतिस्पर्धी संघाचे आक्रमण परतवून लावले. फ्रान्सचा स्ट्रायकर ओलिवर गिरोडच्या मते कोर्टोईसच्या तुलनेत लारिसचे पारडे वरचढ राहील. गिरोड व कोर्टोईस हे दोघेही चेल्सीतर्फे खेळतात.3बेल्जियम संघाला डिफेंडर थॉमस मेनुएरची अनुपस्थिती भरून काढवी लागेल. त्याने दोन्ही बाजूने बेल्जियमच्या आक्रमणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ब्राझीलचा स्टार नेमारला पाडल्यामुळे मुनएरला स्पर्धेत दुसºयांदा पिवळे कार्ड मिळाले. त्यामुळे त्याला मंगळवारच्या लढतीत खेळता येणार नाही.4बेल्जियमला स्टार फॉरवर्ड एडन हेजार्डकडून चमकदार कामगिरीची आशा राहील. त्याने आपल्या वेगाने सर्वांना प्रभावित केले आहे.फ्रान्ससाठी धोकादायक ठरू शकतो हेजार्डसेंट पीटर्सबर्ग : एडन हेजार्ड गेल्या एक दशकापासून फ्रान्सच्या अकादमी प्रणालीच्या सर्वांत प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे, पण तो दिदिएर डेसचॅम्सच्या संघाच्या विश्वकप जिंकण्याच्या स्वप्नावर पाणी फेरू शकतो.बेल्जियमच्या ब्रेन-ली-क्रोम्टेमध्ये जन्मलेल्या हेजार्डची कामगिरी लवकरच शेजारी देशात पसरायला लागली आणि वयाच्या १४ व्या वर्षी लिलीने त्याला आपल्यासोबत जोडले. हेजार्डने दोन वर्षांनंतर लीग -१ मध्ये व्यावसायिक पदार्पण केले व फ्रान्स लीगच्या सर्वांत प्रतिभावान खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.त्याने दोनदा लीगमध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकाविला आणि २०१० मध्ये लिलीला लीग-१ आणि चषक असे दुहेरी यश मिळूवन दिले. चेल्सीने २०१२ मध्ये त्याला चार कोटी ३० लाख डॉलर्सला करारबद्ध केले.इंग्लंडमध्ये सहा मोसमात हेजार्डने दोन लीग जेतेपद व प्रशंसा मिळवली.आता रशियामध्ये हेजार्डकडे बेल्जियमच्या सुवर्ण पिढीचा भागम्हणून बघितले जात आहे. तो देशाला प्रथमच विश्वविजेतपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावूशकतो.विन्सेंट कोंपानीने दुखापतीनंतर पुनरागमन केल्यावरही रोबर्टो मार्टिनेजने हेजार्डला कर्णधारपदी कायम ठेवले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने चमकदार कामगिरी करीत संघाला ब्राझीलविरुद्ध विजयी केले. लहाणपणी हेजार्डने फ्रान्सचा विश्वकप १९९८ चॅम्पियन जिनेदिन जिदानकडून प्रेरणा घेतली. आता २० वर्षांनंतर हेजार्ड जिदानची बरोबरी साधण्यापासून दोन विजय दूर आहे.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल