शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

हिजाबविरोधाचे पडसाद, इराणी संघाने राष्ट्रगीत म्हटलेच नाही! धून वाजली, पण खेळाडू फक्त उभे राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 09:52 IST

हिजाब परिधान न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला अटक केली होती. तीन दिवसांनी तिचा मृत्यू झाला होता. नंतर देशात विरोध सुरू  झाला.

दोहा : कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या इंग्लंड-इराण या दुसऱ्या लढतीत अनोखा प्रकार घडला. इराणमध्ये  सुरू असलेल्या हिजाबसक्तीविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खेळाडूंनी सामन्याआधी राष्ट्रगीत न गाता सरकारचा विरोध केला. हिजाब परिधान न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला अटक केली होती. तीन दिवसांनी तिचा मृत्यू झाला होता. नंतर देशात विरोध सुरू झाला. सप्टेंबरमध्ये सेनेगलविरुद्ध सामन्यात देशातील महिलांना पाठिंबा देताना इराणच्या फुटबॉलपटूंनी राष्ट्रगीतदरम्यान आपल्या संघाचे चिन्ह न दिसण्यासाठी काळे जॅकेट परिधान केले होते. 

राष्ट्रगीत न गाण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेतला होता. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर कोणत्याही खेळाडूच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसले नाहीत.     - अलिर्जा जहानबख्श, कर्णधार - इराण

हिजाब काढल्याने अभिनेत्रींना अटकतेहरान - इराणमध्ये मागील दोन महिन्यांपासून हिजाबसक्तीविरोधात तीव्र आंदोलन करीत आहेत. त्यांच्या समर्थनासाठी हेंगामेह गजियानी आणि कातायुन रियाही या दोन प्रख्यात अभिनेत्रींनी हिजाब उतरवून फोटो सोशल मीडियामध्ये शेअर केले. सरकारच्या आदेशाविरोधात कृती केल्याच्या आरोपावरून दोघींना अटक करण्यात आली आहे. हेंगामेह गजियानी यांनी फोटोसोबत म्हटले होते, बहुतेक माझा हा अखेरचा व्हिडीओ असेल. मला फक्त एवढेच सांगायचे आहे की काहीही झाले तरी या क्षणापासून अखेरच्या श्वासापर्यंत मी इराणच्या जनतेसोबत आहे.

टॅग्स :IranइराणFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२