शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

फिफा विश्वचषक स्पर्धेवर ‘फ्रेंच किस’, फ्रान्सचे दुसरे जगज्जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 04:06 IST

ग्रीझमन, पोग्बा, एमबाप्पे या स्टार खेळाडूंनी नोंदवलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर फ्रान्सने दुसरे विश्वविजेतेपद पटकावत झुंजार क्रोएशियाला ४-२ असे नमवले.

मॉस्को : ग्रीझमन, पोग्बा, एमबाप्पे या स्टार खेळाडूंनी नोंदवलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर फ्रान्सने दुसरे विश्वविजेतेपद पटकावत झुंजार क्रोएशियाला ४-२ असे नमवले. सामन्याच्या १८व्या मिनिटाला क्रोएशियाला स्वयंगोलचा फटका बसला आणि यानंतर फ्रान्सने जबरदस्त वर्चस्व राखले.महिनाभर रंगलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अपेक्षेप्रमाणेच धडाकेबाज रंगला. फ्रान्सने आक्रमक खेळ करत आपला इराद स्पष्ट केला. परंतु, त्यांना आक्रमक खेळानेच प्रत्युत्तर देताना क्रोएशियाने पुन्हा एकदा झुंजार खेळाचे प्रदर्शन केले.हॉलिवूड स्टार्सच्या शानदार सादरीकरणाने दिमाखात पार पडलेल्या समारोप सोहळ्यानंतर लुझनिकी स्टेडियमवर दर्जेदार खेळाचा धडाका झाला. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पॉल पोग्बा, अँटोइन ग्रीझमन, कायलियन एमबाप्पे या स्टार्स खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. मात्र, त्याचवेळी फ्रान्सला क्रोएशियाच्या झुंजार खेळाचा सामना करावा लागला. पुन्हा एकदा पिछाडीवरुन पुनरागमन करताना क्रोएशियाने फ्रान्सला झुंजवले.१८व्या मिनिटाला स्वयंगोलचा फटका बसल्याने क्रोएशिया पिछाडीवर पडले. यावेळी मिळालेल्या फ्री किकवर फ्रान्सच्या ग्रीझमनने अचूक किक मारत चेंडूला गोलजाळ्याची दिशा दिली. मात्र उडी मारलेल्या मारिओ मँडझुकीचच्या डोक्याला चेंडू लागून थेट गोलजाळ्यात गेला. यावेळी फ्रान्सच्या पाठिराख्यांनी मोठा जल्लोष केला खरा, पण त्यांचा आनंद फारवेळ टिकला नाही.२८व्या मिनिटाला फ्रान्सच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारलेल्या इवान पेरिसिक याने अप्रतिम गोल करत क्रोएशियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या सामन्यात क्रोएशियाने पिछाडीवरुन बरोबरी साधल्याने पुन्हा एकदा क्रोएशियन धक्कादायक निकाल लावणार अशी शक्यता निर्माण झाले. यामुळे फ्रान्सच्या पाठिराख्यांनाही अश्रू अनावर झाले होते. परंतु, हुकमी खेळाडू ग्रीझमन याने फ्रान्सला मोठा दिलासा देताना पेनल्टी किक सत्कारणी लावली. फ्रान्सने क्रोएशियाच्या गोलक्षेत्रात धडक मारल्यानंतर चेंडू पेरिसिकच्या हाताला लागला. यावर रेफ्रींनी अपेक्षित निर्णय न दिल्याने फ्रान्सने ‘वार’ प्रणालीच्या जोरावर पेनल्टी मिळवली. ही संधी ग्रीझमनने ३८व्या मिनिटाला साधून फ्रान्सला २-० असे आघाडीवर नेले. ही आघाडी मध्यंतरापर्यंत कायम राखली.मध्यंतरानंतर क्रोएशियन्सनी पुनरागमनाचे खूप प्रयत्न केले. परंतु, फ्रान्सचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. त्याचवेळी पॉल पोग्बा (५९ मिनिट) आणि एमबाप्पे (६५) झटपट गोल करत फ्रान्सची आघाडी ४-१ अशी भक्कम करत जगज्जेतेपद जवळपास निश्चित केले. यानंतर मारिओ मँडझुकीचने ६९व्या मिनिटाला गोल करत क्रोएशियाची पिछाडी २-४ अशी कमी केली. परंतु, फ्रान्सने यानंतर क्रोएशियाला कोणतीही संधी न देता आपली आघाडी अखेरपर्यंत कायम राखत बाजी मारली.>यंदाचा फिफा विश्वचषक पटकावत फ्रान्सने आणखी एक इतिहास रचला. विश्वचषक स्पर्धा दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा जिंकण्याच्या यादीत आता फ्रान्सचेही नावा जोडल्या गेले. आतापर्यंत पाच देशांनी दोन किंवा त्याहून अधिक वेळा विश्वचषक जिंकला आहे. आता फ्रान्स हा सहावा देश आहे ज्याने दोन वेळा विश्वचषक पटकावले. फिफा विश्वचषक सर्वाधिक वेळा जिंकण्याची किमया ब्राझीलने केली. त्यांनी १९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२ मध्ये चषक पटकाविले. त्यानंतर जर्मनीचा क्रमांक लागतो. त्यांनी चार वेळा म्हणजे १९५४, १९७४, १९९० आणि २०१४ मध्ये स्पर्धा जिंकली होती. इटलीने सुद्धा चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. १९३४, १९३८, १९८२ आणि २००६ मध्ये त्यांनी चषकावर नाव कोरले आहे. उरुग्वेने १९३० आणि १९५० मध्ये चषक पटकाविला होता.>लुका मॉडरिचला गोल्डन बॉलयंदाच्या विश्वचषकात जबरदस्त खेळाने प्रभावित करणाºया क्रोएशियाचा कर्णधार लुका माडरिच हा गोल्डन बॉलचा मानकरी ठरला. विश्वचषकाच्या इतिहासात सलग सहाव्यांदा उपविजेत्या संघाच्या खेळाडूस सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला आहे. लुका माडरिच याने एक कर्णधार आणि मिडफिल्डर म्हणून जी कामगिरी केली. त्याने कामगिरीने इतिहासात तो नेहमीच ओळखला जाईल. त्याच्या नेतृत्वाखाली क्रोएशियाने स्पर्धेत शानदार प्रदर्शन अंतिम फेरी गाठली. झिदान याच्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या युरोपियन संघाच्या खेळाडूला हा गोल्डन बॉलचा मान मिळाला आहे.>आता लक्ष कतारकडेपुढील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कतारमध्ये रंगणार असून पहिल्यांदाच यजमानपद भूषविण्यासाठी सज्ज असलेल्या कतारकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रशिया २०१८ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी कतारचे अमीर शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्याकडे विश्वचषक मशाल आणि प्रतिकात्मक चेंडू सोपविला.>सामनावीर ठरलेला अँटोइनी ग्रीझमन फ्रान्सच्या विश्वविजेतेपदाचा शिल्पकार ठरला. त्याने १८व्या मिनिटाला अप्रतिम फ्री किक मारत चेंडूला गोलजाळ्याची दिशा दिली. यावेळी मँडझुकिचने मारलेल्या हेडरमुळे स्वयंगोल झाला, पण ग्रीझमनची किक निर्णायक ठरली. यानंतर त्याने ३८व्या मिनिटाला पेनल्टी किक सत्काराणी लावत संघाला आघाडीवर नेत फ्रान्सच्या विजेतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले.>रोख पुरस्कारएकूण रक्कम४०० मिलियन डॉलर्स(सुमारे २७०० करोड रुपये)विजेता संघ३८ मिलियन डॉलर्स(सुमारे २६०करोड रुपये)उपविजेता संघ२८ मिलियन डॉलर्स(सुमारे १९१करोड रुपये)तिसºया क्रमांकाचा संघ२४ मिलियन डॉलर्स(सुमारे १६४करोड रुपये)चौथ्या क्रमांकाचा संघ२२ मिलियन डॉलर्स(सुमारे १४८करोड रुपये)

टॅग्स :Franceफ्रान्सFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८