शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

विजेतेपद फ्रान्सच्या दृष्टीपथात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 05:37 IST

विश्वविजेते होण्याच्या आपल्या ध्येयापासून फ्रान्स केवळ एकच पाऊल दूर आहे. बेल्जियमसारख्या तगड्या संघाला पराभूत करण्यासाठी आवश्यक डावपेच आखणारे डिडिएर डिशाँ हेदेखील एक विश्वविजयी खेळाडू आणि प्रशिक्षक असा दुहेरी बहुमान प्राप्त करू शकतात.

- रणजीत दळवीविश्वविजेते होण्याच्या आपल्या ध्येयापासून फ्रान्स केवळ एकच पाऊल दूर आहे. बेल्जियमसारख्या तगड्या संघाला पराभूत करण्यासाठी आवश्यक डावपेच आखणारे डिडिएर डिशाँ हेदेखील एक विश्वविजयी खेळाडू आणि प्रशिक्षक असा दुहेरी बहुमान प्राप्त करू शकतात. याआधी ब्राझीलचे मारिओ झगालो आणि जर्मनीचे फ्रान्स बेकेनबॉअर यांनी असे यश संपादन केले होते. डिशाँ त्यात यशस्वी होतील की कसे, हे यथावकाश समजलेच; पण या स्पर्धेतील सर्वात मोठे निपुण रॉबर्टाे मार्टिनेस यांच्यावर डाव उलटविण्यात ते यशस्वी झाले. त्यांचे युद्धशास्त्र ते कसेही असो, निर्णायक ठरले!ही लढत फ्रान्सने तशी आरामात जिंकावयास हवी होती. कायलियन एमबाप्पेने आपल्या कलात्मक खेळ आणि चलाखीद्वारे ज्या संधी उपलब्ध केल्या होत्या. त्यापैकी एखादी तरी आॅलिव्हिएर जिरूडने सत्कारणी लावणे आवश्यक होते. शेवटी, एका सेट-पीस वर लढतीचा निकाल लागला असला, तरी आक्रमण आणि बचाव यांचा उत्तम मिलाफ साधणाऱ्या फ्रान्सचे कौतुक होणे गरजेचे आहे. या सामन्यात खरा संघर्ष मध्यक्षेत्रातच वर्चस्वासाठी झाला. त्यामुळे अधिक गोल झाले नाहीत, हे स्वाभाविकच.बेल्जियमच्या आक्रमणांमध्ये तशी धार कमी असली, तरी त्यांनी सुरुवातीला जोमाने हल्ले केले. रोमेलू लुकाकुची साधी लुकलूकही पाहावयास मिळाली नाही व आक्रमणाची जबाबदारी असणारा विंग बॅक नासर चॅडली अपेक्षित प्रभाव पाडू शकला नाही; मात्र ईडन हॅझार्ड आणि केव्हिन डे ब्रुश्न आणि मध्यक्षेत्रात मुक्तपणे वावरण्याची मुभा असणारा मॉरोअने फेलायनी यांचे काही हल्ले चांगलेच धोकादायक ठरले. फ्रान्सने ते कसेबसे थोपविले.प्रथम हॅझार्ड आणि डे ब्रुइन यांनी उत्तम समन्वय साधला; मात्र हॅझार्डचा फटका गोलमुखासमोरून बाहेर गेला. जेव्हा हॅझार्डने पुन्हा जोरदार फटका घेतला, तेव्हा फ्रेंच बचावपटू राफाएल व्हरानने तो निष्फळ ठरविला. त्या चेंडूसाठी फेलायनीही झेपावला होता; पण व्हरान नशिबवान ठरला. यानंतरचा टोबी अ‍ॅल्डरविरल्डचा अर्धा टर्न मारून घेतलेला फटका फ्रेंच कर्णधार ह्युगो लॉरिसने उजवीकडे झेपावत रोखला नसता, तर आपत्ती ओढवलीच होती!हा दिवस व्हरानचा तसेच सॅम्युएल उमटीटीचा होता. व्हरानने डे ब्रुइनच्या क्रॉसची बदललेली दिशा असो की त्यांनी उत्तरार्धात ड्राइस मर्टेन्सचे उजवीकडून आलेल्या पासेसना विफल ठरविण्यात प्राप्त केलेले यश, या दोघांनी बेल्जियमच्या फॉरवर्डस्ना समोरून गोलहल्ले करू दिले नाहीत. तिथेच त्यांनी मुख्य लढाई जिंकली.बेल्जियमवरही एकदा संकट ओढवले होते. एमबाप्पेचा थ्रू पास अचूक होता व त्यावर पाव्हार्ड उजवीकडून आत घुसला. तो उजवीकडे चेंडू ‘प्लेस’ करेल असे थिबॉ कुर्ताेआचे पूर्वानुमान; पण त्याने केला उलट बाजूला. सुदैवाने उंचपुºया थिबॉचा उजवा पाय तो शॉट विफल करून गेला. हे झाले मध्यंतराआधी. शेवटी तो निर्णायक गोल ५४व्या मिनिटाला झाला. अंतोआँ ग्रिझमनचा कॉर्नर केवढा अचूक! त्या इनस्विंगवर चेंडूला फक्त डोके लावण्याचे काम उमटीटीने केले. हा त्याच्या आयुष्यातला अनमोल गोल ठरावा.फ्रान्सने मध्यक्षेत्रात एवढी नाकेबंदी केली की, त्यामुळे केवळ एकदाच त्यांच्यावर हल्ला झाला. मर्टन्सचा अचूक क्रॉस, तोही पेनल्टी स्पॉटजवळ; पण फेलायनीचा हेडर, जी त्याची खासियत, चेंडू किंचित बाहेर आणि फ्रान्स सुरक्षित! पॉल पॉग्बाने संघाच्या हितासाठी आक्रमक वृत्तीला आवर घालताना फेलायनीला रोखण्याची महत्त्वाची कामगिरी पार पाडली. मध्यक्षेत्रातील इटुकला एनगोलो काँटे आणि मेहनती ब्लेझ मॅटुइडी यांनी जबरदस्त खेळ केला. काँटे सर्वांच्या मार्गात अडथळा आणत गेला, तर मॅटुइडी सतत आघाडीच्या फळीला थ्रू पासेस करत राहिला.मार्टिनेझनी आपल्या चुका सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मुसा डेम्बेलेला एमबाप्पेवर ‘मार्कर’ म्हणून लावणे हा डाव फसला तसाच यॅनिक कॅरास्सोला फेलायनीच्या जागी उत्तरार्धात आणण्याचा मिची बात्शुयीला ‘स्टॉपेज टाईम’मध्ये चॅडलीऐवजी उतरविणे त्यांच्या हताशपणाचे प्रतीक ठरले!

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८newsबातम्या