शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

माजी विश्वविजेत्यांची आत्मविश्वासू ‘री एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 02:22 IST

रशिया विश्वचषकात मानहानीकारक एक्झिट घेतलेला जर्मनीचा फुटबॉल संघ गुरूवारी रात्री पहिल्यांदाच आंतरराष्टÑीय मैदानावर उतरला. सामना स्वत:च्याच देशात असला तरी समोर विश्वचषक विजेता बलाढ्य फ्रान्सचा संघ होता.

- चिन्मय काळे

मुंबई : रशिया विश्वचषकात मानहानीकारक एक्झिट घेतलेला जर्मनीचा फुटबॉल संघ गुरूवारी रात्री पहिल्यांदाच आंतरराष्टÑीय मैदानावर उतरला. सामना स्वत:च्याच देशात असला तरी समोर विश्वचषक विजेता बलाढ्य फ्रान्सचा संघ होता. पण रशियाचे कुठलेही दडपण न बाळगता फ्रान्सला गोलशून्य रोखण्यात मिळवलेले यश जर्मनीची जुन्या परंपरेला साजेशा खेळाची चुणूक देऊन गेले. ही जर्मन फुटबॉल संघासाठी आत्मविश्वास वाढविणारी ‘री एन्ट्री’ म्हणता येईल.जर्मनी हे फुटबॉल विश्वातील ठळक नाव. चार वेळा विश्वचषक स्वत:च्या नावावर कोरलेल्या जर्मन फुटबॉल संघाला आंतरराष्टÑीय स्तरावरील मानहानीकारक ‘एक्झिट’ यंदा रशियात झालेला फुटबॉल विश्वचषक स्वीकारावी लागली. गतविजेते साखळीतच गारद झाले होते. यामुळे विश्वचषकानंतर जर्मन फुटबॉल संघाबाबत आंतरराष्टÑीय फुटबॉल विश्वात नानावीध चर्चा सुरू झाल्या होत्या. संघात परिवर्तनाचे वारे वाहू लागले. संघाची रणनिती व एकूणच संघाचा मैदानावरील वावर पूर्णपणे बदलेल, असे प्रशिक्षक जोकिम लोव्ह यांनाही स्पष्ट करावे लागले. या सर्व निर्णयांची ‘लिटमस टेस्ट’ युरोपियन राष्टÑांच्या पहिल्यांदाच होणाºया ‘लीग’ स्पर्धेच्या शुभारंभाच्या सामन्यात होती. कारण हा सामना फ्रान्सविरुद्ध होता.जर्मनीतील म्युनिकच्या आकर्षक स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात फ्रान्सने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील संघच मैदानात उतरवला होता. मबाप्पे, पोगबा, जिरुड, ग्रीन्झमन यासारख्या सुपरस्टार्सचा त्यात समावेश होता. विश्वचषकात मोक्याच्या संधी घालवलेल्या अनुभवी मारिओ गोमेझ, मॅट्स ह्युमेल्स, ज्युलिअन ड्रॅक्सलर व सामि खेदीरा यांना जर्मनीने या सामन्यापासून दूर ठेवले. पण मार्को रोस, थॉमस मूलर, टोनी क्रूस, जोशा किमिच यांच्या साथीला लिआॅन गोरेत्झ्काला संधी देण्यात आली. यापैकी गोरेत्झ्का वगळल्यास उर्वरित तोच विश्वचषकातीलच पराभूत संघ होता. त्यामुळे जर्मन फुटबॉल चाहत्यांच्या मनात धाकधूक होती. सामान्यातील पहिल्या २० मिनीटात फ्रान्सने अपेक्षेप्रमाणे आक्रमक खेळ केला. पण विश्वचषकातील चुकांवर पांघरुन घालण्यात अनुभवी जेरोम बोएतॅन्ग व अ‍ॅन्टोनिओ रुडीगर यांना यश आले. कर्णधार मॅन्युएल न्युअर यानेदेखील जुन्या खेळाला साजेसे गोलरक्षण केले. दुसरा हाफमध्ये जर्मनीने माजी विश्वविजेते असल्याची चुणूक दिली. विश्वचषक स्पर्धेत जर्मनीच्या संघात समन्वयाचा अभाव होता. मध्यम फळीकडून आघाडीसाठी बॉलच येत नव्हता. या सामन्यात मात्र मूलर, क्रूस, नवोदीत टीमो वेर्नर यांनी सातत्याने व्युहरचनेत बदल करीत आक्रमणांची सरबत्ती केली. पण फ्रान्सच्या नवोदीत अल्फान्सो ऐरोला या गोलरक्षकानेसुद्धा खेळाची चुणूक दाखवत आक्रमणे परतवून लावली. दोन्ही अनुभवी संघांकडून अत्यंत कमी झालेले फाऊल्स व त्यामुळेच अत्यल्प अशा ‘स्पॉट किक’मध्ये हा सामना रंगला. मात्र दुसºया हाफमध्ये जर्मन संघाकडून झालेली आक्रमणे व फ्रान्ससमोर केलेला बचाव हाच या सामान्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.

टॅग्स :Footballफुटबॉल