शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

भारताच्या माजी फुटबॉलपटूचा कॅन्सरशी लढा, हवंय आर्थिक पाठबळ

By स्वदेश घाणेकर | Updated: August 14, 2018 09:45 IST

ते सध्या 70 वर्षांचे आहेत... आपल्या आयुष्यातील बराच काळ त्यांनी भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या फुटबॉलसाठी खर्ची घातला...  1971च्या फुटबॉल संघाच्या रशिया दौ-यात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही केले होते...

ते सध्या 70 वर्षांचे आहेत... आपल्या आयुष्यातील बराच काळ त्यांनी भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्याफुटबॉलसाठी खर्ची घातला...  1971च्या फुटबॉल संघाच्या रशिया दौ-यात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही केले होते... भारताचा हा माजी फुटबॉलपटू आज कॅन्सरशी लढा देत आहे आणि आर्थिक सहकार्यासाठी त्यांनी मदतीची साद घातली आहे. ऑर्थर परेरा असे या माजी खेळाडूचे नाव आहे आणि मागील 18 दिवसांपासून ए.सी.परेरा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

27 डिसेंबर 1948मध्ये गोव्यातील अल्डोना येथील त्यांचा जन्म... स्थानिक मर्सेस स्पोर्ट्स क्लबने परेरा यांच्यातील फुटबॉल प्रेम हेरले. 1965 ते 67 या कालावधीत त्यांनी याच क्लबचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर ते मायानगरी मुंबईत आले. एक सत्र त्यांनी ब्रिटानिया बिस्किट कंपनी फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. डाव्या पायाने गोल करण्याचे कौशल्य त्या काळात क्वचितच कुणामध्ये दिसले असेल. 1970 मध्ये त्यांनी कोरेस इंडिया लिमिटेड कंपनी जॉइन केली. D क्षेत्रात गोल करण्यात तरबेज असलेल्या परेरा यांनी कोरेस संघाला जेतेपद पटकावून दिले. 

त्यांनी ही यशोगाथा ओर्काय मिल्स संघाकडूनही कायम राखली. ओर्काय मिल्सला परेरा यांनी बरीच जेतेपदे जिंकून दिली. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले. 1971 ते 76 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. 1971मध्येच त्यांना भारतीय संघाकडून बोलावणे आले आणि रशिया दौ-यातील भारतीय संघाचा सदस्य होण्याचा मान त्यांनी पटकावला. 

त्यांचा फिटनेस कोणालाही हेवा वाटावा अशा होता. फुटबॉलपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मालाड येथील सेंट जोसेफ स्कूलमध्ये क्रीडा प्रशिक्षक, हॉकी आणि क्रिकेट संघाचे फिजिकल फिटनेस पाहण्याचे काम केले. 1998 पासून ते मागील काही वर्षांपर्यंत ते कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांना शाळेने पुन्हा जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्याचा मान राखत ते 12 वर्ष कार्यरत  होते. 

मुलांचा सराव करून घेत असताना त्यांचा उजवा खांदा अचानक दुखू लागला आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तेथून त्यांना थेट बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मागील वीसेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले असून कुटुंबीयांनी सर्व जमापुंजी एकत्र करून 10 लाख रुपये जमवले आहेत आणि पुढील उपचारासाठी त्यांना आणखी मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी फ्लुएल अ ड्रिम ( FUEL A DREAM) या संस्थेने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.सध्या त्यांना श्वसननलिकेद्वारे अन्न पुरवले जात आहे. कॅन्सरमुळे त्यांचे 12 किलो वजन कमी झाले आहे. दोन आठवड्यापासून त्यांच्या हालचालीही मंदावल्या आहेत.

टॅग्स :FootballफुटबॉलMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रSportsक्रीडा