शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ओझीलच्या रुपात पहिले ‘रेड कार्ड’; राजीनामा ही जर्मनीच्या संघ बदलाची सुरूवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 16:57 IST

हा ओझिलने स्वत:हून घेतलेला निर्णय आहे की, त्याच्या निमित्ताने हे पहिले ‘रेड कार्ड’ देण्यात आले असून आता आणखी अशा किती कार्ड्ची रिघ लागते, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

ठळक मुद्देदक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात गोल करण्याच्या चांगल्या संधी गमावलेला मॅट्स ह्युमेल्स यांना राष्ट्रीय संघाला रामराम ठोकावा लागण्याची शक्यता आहे.

चिन्मय काळे : जर्मन फुटबॉल संघाचा लोकप्रिय मीडफिल्डर मेसुट ओझिल याने वर्णभेदी टीकांनी नाराज होऊन आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून सन्यास घेतला. मुळात जर्मनीच्या विश्वचषकातील मानहानीकारक पराभवानंतर संघात आमुलाग्र बदल होणार, हे नक्की होते. त्यामुळे हा ओझिलने स्वत:हून घेतलेला निर्णय आहे की, त्याच्या निमित्ताने हे पहिले ‘रेड कार्ड’ देण्यात आले असून आता आणखी अशा किती कार्ड्ची रिघ लागते, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

जर्मनीची विश्वचषक इतिहासातील सर्वात खराब कामगिरी यंदा रशियात झाली. दक्षिण कोरियाविरुद्धच्या निर्णायक सामन्यात महत्त्वाच्या खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे संघाने कच खाल्ली. ‘अनुभवी मीडफिल्डर सामी खेदीरा आणि मेसुट ओझिल, हे दोघे या परभवाचे मुख्य गुन्हेगार आहेत’, असे स्पष्ट मत ज्येष्ठ गोलरक्षक आॅलिव्हर कान्ह याने सामन्यानंतर लगेच व्यक्त केले होते. ‘संघाच्या कामगिरीत उतार-चढाव येतच असतात. पण हा पराभव अनपेक्षित होता. त्याची परिणीती संघातील बदलाने होईल व ती येत्या काळात दिसेलच’, असे सांकेतिक भाष्य विश्वचषक संघाचा माजी कर्णधार फिलिप ल्हाम यानेही व्यक्त केले होते. याखेरीज जर्मन क्रीडा पत्रकारांनीसुद्धा ‘संघ बदल’ हा एकमेव पर्याय असल्याचे म्हटले होते. त्यानुसार मूळ तुर्किश असलेल्या ओझिलची एक्झिट पहिली ठरली आहे.तुर्कस्थानच्या अध्यक्षांसह लंडनमध्ये फोटो काढणे, हे ओझिलच्या निवृत्तीचे निमित्त ठरले आहे. स्पर्धेतील खराब कामगिरीबद्दल आधीच तो लक्ष्यावर असताना या फोटोमुळे वर्णद्वेषी टीका झाली. त्यातून त्याने जर्मनी सोडले. पण ओझिलची ही ‘एक्झिट’ एक सुरुवात असेल तर आता दुसरा क्रमांक कुणाचा आणि अशा किती जणांना जर्मन संघाला बाय-बाय करावा लागणार आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.स्पर्धेतील कामगिरीवरुन ओझिलपाठोपाठ सर्वाधिक टीका झाली ती, खेदीरावर. यामुळे पुढली विकेट ही खेदीराची असेल, असे चित्र आहे. त्यापाठोपाठ ३३ वर्षीय स्ट्रायकर मारिओ गोमेझ, अत्यंत वलयांकित असूनही खराब कामगिरी केलेला गोलरक्षक कर्णधार मॅन्युअल न्युअर, दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात गोल करण्याच्या चांगल्या संधी गमावलेला मॅट्स ह्युमेल्स यांना राष्ट्रीय संघाला रामराम ठोकावा लागण्याची शक्यता आहे.वास्तवात अनुभवी व लोकप्रिय खेळाडू थॉमस मूलरबाबतही जर्मनीत नाराजी आहे. पण मूलर हा प्रशिक्षक ज्योकिम लो यांच्या खास विश्वासातील आहे. तसेच त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे वलय आहे. त्यामुळे मूलरला २०२० च्या युरो चषकापर्यंत एक संधी दिली जाण्याची शक्यता आहे. एकूणच ओझीलचा ‘राजिनामा’ हा आता जर्मन फुटबॉल संघाच्या बदलांची सुरूवात ठरण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलGermanyजर्मनी