समारा - फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विजेता इंग्लंड आणि स्वीडन हे शनिवारी समोरासमोर आले. या लढतीचा निकाल काय लागेल, कोण बाजी मारेल, यावर चर्चा रंगत असताना इंग्लंड आणि स्वीडन संघाच्या माजी खेळाडूंमध्ये निकालावरून पैज लागली आहे. स्वीडनकडून सर्वाधिक 62 गोल करणा-या झाल्टन इब्राहिमोविचने राष्ट्रीय संघाला पाठिंबा दर्शवताना इंग्लंडच्या माजी कर्णधार डेव्हिड बेखॅमला चॅलेज दिले. इंग्लंड जिंकल्यास तु सांगशील त्या हॉटेलमध्ये तुला डिनरला घेऊन जाईन. पण, स्वीडन जिंकल्यास मला जे हव आहे, ते तू मला खरेदी करून दे, असे इब्राहिमोविचने चॅलेंज दिले.
FIFA World Cup Quarter finals : ... अन् इब्राहिमोविचचे चॅलेंज बेखॅमने स्वीकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 20:30 IST