शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

Fifa World Cup, Messi Argentina : संकटमोचक लिओनेल मेस्सी! अर्जेंटिनाचे आव्हान वाचवताना मॅरेडोनाच्या विक्रमाशी बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 7:34 AM

मेक्सिकोविरुद्ध अर्जेंटिनाचा संघ यापूर्वी पराभूत झाला नव्हता, परंतु पहिल्या हाफमध्ये  त्यांनी अर्जेंटिनाला दिलेली टक्कर पाहून चाहत्यांच्या मनात धाकधुक होती.

Fifa World Cup, Lionel Messi Argentina : फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत अर्जेंटिनाने आव्हान कायम राखले. पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियाकडून धक्कादायक पराभव पत्करल्यानंतर आजच्या सामन्य़ाकडे साऱ्यांचेच लक्ष होते. मेक्सिकोविरुद्धअर्जेंटिनाचा संघ यापूर्वी पराभूत झाला नव्हता, परंतु पहिल्या हाफमध्ये  त्यांनी अर्जेंटिनाला दिलेली टक्कर पाहून चाहत्यांच्या मनात धाकधुक होती. मात्र, लिओनेल मेस्सी संकटमोचक ठरला.. त्याने दुसऱ्या हाफमध्ये अप्रतिम गोल केलाच, शिवाय दुसऱ्या गोलसाठी सहाय्य करून प्लेअर ऑफ दी  मॅच ठरला. अर्जेंटिनाने २-० अशा फरकाने मेक्सिकोवर विजय मिळवला. 

Fifa World Cup : केरळ ते कतार! पाच मुलांची आई Messi ची 'डाय हार्ट' फॅन, अर्जेंटिनाला सपोर्ट करण्यासाठी 'OOLU' सोबत करतेय ट्रिप

अरेबियाकडून झालेल्या पराभवानंतर अर्जेंटिनावर दडपण होते आणि ते जाणवलेही. पहिल्या हाफमध्ये मेक्सिकोने त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आणि  उल्लेखनीय खेळ करताना दोन वेळच्या विजेत्यांना कडवी झुंज देण्यास भाग पाडले. पण, मेस्सीने दुसऱ्या हाफमध्ये कमाल केली आणि अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा आत्मविश्वास परत मिळवला. अर्जेंटिनाने २००४नंतर मेक्सिकोविरुद्धची ११ सामन्यांत ( ८ विजय व ३ अनिर्णित) अपराजित मालिका कायम राखली. वर्ल्ड कप स्पर्धेतील मेक्सिकोचा हा अर्जेंटिनाविरुद्धचा चौथा पराभव ठरला. अर्जेंटिनाने नायजेरियाला सर्वाधिक ५ वेळा पराभूत केले आहे.

६४व्या मिनिटाला मेस्सीने पहिला गोल करून दिग्गज दिएगो मॅरेडोना यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. वर्ल्ड कप स्पर्धेतील मेस्सीचा हा आठवा गोल ठरला, मॅरेडोना यांनीही वर्ल्ड कपमध्ये ८ गोल केले आहेत. आता केवळ गॅब्रिएल बॅटीस्टुटा ( १०) हे अर्जेंटिनाकडून सर्वाधिक गोल करणारे खेळाडू आहेत.  ८७ व्या मिनिटाला मेस्सीच्या मदतीने एंझो फर्नांडेसने गोल करून अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी भक्कम केली. २१ वर्ष व ३१३ दिवसांचा फर्नांडेस हा अर्जेंटिनाकडून वर्ल्ड कप सपर्धेत गोल करणारा मेस्सीनंतर ( २००६ साली, १८ वर्ष व ३५७ दिवस ) युवा खेळाडू ठरला आहे. 

अर्जेंटिनाने वर्ल्ड कप स्पर्धेतील सात सामन्यांत प्रथमच क्लीन शीट ठेवली आहे. यापूर्वी २०१४ मध्ये त्यांनी नेदरलँड्सविरुद्ध गोलशून्य बरोबरी ठेवली होती. अर्जेंटिनासाठी मेस्सीने सलग सहाव्या सामन्यात गोल केला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये ( ६ नोव्हेंबर २०११ ते सप्टेंबर २०१२) त्याने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे.  C गटात पोलंड ४ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर अर्जेंटिना व सौदी अरेबिया यांच्या खात्यात प्रत्येकी ३ गुण आहेत. मात्र, गोल फरकामुळे अर्जेंटिनाची बाजू वरचढ आहे. सौदी अरेबियाला काल पोलंडने २-० असे पराभूत केले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Lionel Messiलिओनेल मेस्सीArgentinaअर्जेंटिनाMexicoमेक्सिको