शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

Fifa World Cup Final : लिओनेस मेस्सीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वर्ल्ड कप इतिहासात असा विक्रम आजतागायत कुणालाच जमला नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 21:07 IST

Fifa World Cup Final 2022 Live Updates : ६०२९ दिवसांपूर्वी लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण केलं होतं...

Fifa World Cup Final 2022 Live Updates : ६०२९ दिवसांपूर्वी लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण केलं होतं... २०१४ला वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु जर्मनीने त्याचा स्वप्न भंग केला... पण, २०२२ मध्ये अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला मेस्सीच्या पासवर ज्युलियन अलव्हारेजने बायसिकल किक मारून पेनल्टी क्षेत्रात गोल करण्याचा प्रयत्न केला. फ्रान्सच्या गोलीने तो रोखला, परंतु रेफरीने ऑफ साईडचा फ्लॅग उचलला होता. पाचव्या मिनिटाला अर्जेंटिनाकडून ऑन टार्गेट प्रयत्न झाला. अर्जेंटिनाने आज आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला.

९व्या मिनिटाला अर्जेंटिनाने कॉर्नर कमावला अन् फ्रान्सच्या बचावपटूंनी चांगलाच कस लागलेला पाहायला मिळाला. अर्जेंटिनाचा प्रत्येक खेळाडू आज गोलसाठी भूकेला दिसला. फ्रान्सच्या बचावपटूंना आज निवांत श्वास घ्यायलाच दिला जात नव्हता.. १३व्या मिनिटाला कायलिन एमबाप्पेने फ्रान्ससाठी गोल करण्याचा पहिला प्रयत्न केला. कधीही डिफेन्सीव्ह खेळावर भर न देणाऱ्या फ्रान्सला आज अर्जेंटिनाच्या पवित्र्यामुळे कोशात जावे लागले. १७व्या मिनिटाला मेस्सीने फ्रान्सच्या बचावातील त्रुटी उघड्यावर पाडल्या, परंतु डी मारियाला चेंडूला अंतिम दिशा देता आली नाही अन्यथा अर्जेंटिनाचा हा  सुपर डुपर गोल होताच. १९व्या मिनिटाला डी पॉलने पेनल्टी बॉक्सबाहेर फाऊल केला अन् फ्रान्सला फ्री किक मिळाला. ऑलिव्हर जिरूडने हवेत गरूड भरारी घेत हेडरद्वारे चेंडूला दिशा दिली, परंतु तो पोस्टच्या वरून गेला. 

२१व्या मिनिटाला डी मारियाला पेनल्टी क्षेत्रात पाडले अन् अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली.  अपेक्षांचे प्रचंड ओझं घेऊन मेस्सी पेनल्टी घ्यायला आला अन् त्याने करिष्मा करून दाखवला.. अर्जेंटिनाने २३व्या मिनिटाला गोल केला. ग्रुप स्टेज, राऊंड १६, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी अन् फायनल... एकाच स्पर्धेत या सर्व टप्प्यांत गोल करणारा मेस्सी जगातील पहिला खेळाडू ठरला. वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये गोल करणारा मेस्सी हा दुसरा वयस्कर खेळाडू ठरला. १९५८ मध्ये स्वीडनच्या लिल्स लिएडोल्म ( ३५ वर्ष व २६४ दिवस) यांच्या नावावर हा विक्रम आहे. मेस्सीने वर्ल्ड कप स्पर्धेत १२ गोल केले आहेत आणि ८ गोल सहाय्य आहे. १९६६ पासूनच्या वर्ल्ड कप इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Argentinaअर्जेंटिनाLionel Messiलिओनेल मेस्सीFranceफ्रान्स