शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Fifa World Cup, ARG vs KSA : आशियाई संघाने अर्जेंटिनाला दाखवला इंगा! लिओनेल मेस्सीचा संघ बेक्कार हरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 17:38 IST

Fifa World Cup, ARG vs SUA : तीन वेळच्या आशियाई चषक विजेत्या सौदी अरेबियाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल नोंदवला.  

Fifa World Cup, ARG vs SUA : तीन वेळच्या आशियाई चषक विजेत्या सौदी अरेबियाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल नोंदवला. दोन वेळच्या ( १९७८ व १९८६) वर्ल्ड कप विजेत्या अर्जेंटिनावर त्यांनी पिछाडीवरून विजय मिळवला. कतारमध्ये आयोजित या स्पर्धेच्या पहिल्या दोन दिवसांत यजमानांसह इराण या आशियाई संघाना हार मानावी लागली होती. त्यामुळे सौदी अरेबियाकडून फार कोणी अपेक्षा ठेवली नव्हती, परंतु त्यांनी चमत्कार केला आणि लिओनेल मेस्सीच्या संघाला पराभवाचा धक्का दिला. सौदी अरेबियाच्या बचावाला आज तोड नव्हता आणि अर्जेंटिनाला काही केल्या बरोबरीचा गोल करता आला नाही.

लिओनेल मेस्सीने पेनल्टीवर अर्जेंटिलाना १०व्या मिनाटाला१-० अशी आघाडी मिळवून दिली. सौदी अरेबियाचे खेळाडू रेफरीच्या निर्णयावर नाखूश दिसले. चार वर्ल्ड कप स्पर्धेत ( २००६, २०१४, २०१८ व २०२२) अर्जेंटिनाकडून गोल करणारा लिओनेल मेस्सी हा पहिला खेळाडू, तर जगभरातील पाचवा खेळाडू ठरला. यापूर्वी पेले, उवे सीलर, मिरोस्लाव्ह क्लोस व ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी अशी कामगिरी केली आहे. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने निर्विवाद वर्चस्व राखताना १-० अशी आघाडी मिळवली. सौदी अरेबियाचा बचाव चांगला राहिला.  दुसऱ्या हाफमध्ये सौदी अऱेबियाच्या सालेह अलशेहरीने ( ४८ मि.) गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. ५३व्या मिनिटाला सालेम अलदावसारीने १८ यार्डाच्या बॉक्सच्या कोपऱ्यावरून अर्जेंटिनाच्या बचावपटूंना चकवून भन्नाट गोल केला. सौदी अरेबियाने २-१ अशी आघाडी घेत अर्जेंटिनाच्या चाहत्यांना धक्का दिला. आता अर्जेंटिनाची बरोबरी मिळवण्याची धडपड सुरू झाली आणि मेस्सी, मारिया जोडी सक्रिय झाली. १९७८ व १९८६च्या वर्ल्ड कप विजेत्या अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतीत ब्राझिल ( ५) व उरुग्वे ( २) यांच्यानंतर सर्वाधिक जेतेपद पटकावणारा संघ आहे. ६३व्या मिनिटाला निकोलास टग्लिफिकोने गोलपोस्टच्या जवळून चेंडू जाळीच्या दिशेने पाठवलाच होता, परंतु सौदी अरेबियचा गोलरक्षक मोहम्मद अलोवैसने चतुराईने तो गोल अडवला. अर्जेंटियन फॅन्सला यावर विश्वासच बसेना. ८०व्या मिनिटाला मेस्सीने फ्री किकवर गोल करण्याची संधी गमावली. ८४व्या मिनिटाला मेस्सीचा हेडरद्वारे गोल करण्याचा प्रयत्न अरेबियन गोलरक्षकाने रोखला. ८ मिनिटांच्या भरपाई वेळेत अर्जेंटिनाकडून जोरदार प्रयत्न झाले, परंतु अरेबियन बचाव त्यांना भेदता येत नव्हता. ९०+१ मिनिटाला गोलरक्षाने चेंडू रोखल्यानंतर रिटर्न फिरला अन् अर्जेटिनाच्या खेळाडूने तो पुन्हा जाळीच्या दिशेने पाठवला. मात्र, अरेबियन खेळाडूने हेडरने तो गोल रोखला. चेंडू रोखण्याच्या प्रयत्नता सौदी अरेबियाच्या गोलरक्षकाचा गुडघा त्यांच्याच खेळाडूच्या बचावपटूवर जोरदार आदळला अन् खेळाडू जमिनिवरच आडवा पडला.

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Argentinaअर्जेंटिनाLionel Messiलिओनेल मेस्सीsaudi arabiaसौदी अरेबिया