शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
15
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
16
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
17
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
18
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
19
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
20
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?

FIFA World Cup 2022: मोरक्कोच्या पराभवानंतर हिंसाचार, संतप्त फॅन्सचा फ्रान्सपासून ब्रुसेल्सपर्यंत धुमाकूळ, हाणामारी, जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 09:37 IST

FIFA World Cup 2022: फ्रान्समध्ये मोरक्कोच्या समर्थकांनी फ्रान्सच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या फ्रेंच फॅन्सवर हल्ला केला. तर ब्रुसेल्समध्ये मोरक्कोच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला आणि जाळपोळ केली

पॅरिस - कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये रात्री झालेल्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने मोरक्कोचा २-० ने पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या मोरक्कोचा पराभव झाल्याने संतप्त झालेल्या मोरक्कोच्या फॅन्सनी प्रचंड हिंसाचार केला. फ्रान्समध्ये मोरक्कोच्या समर्थकांनी फ्रान्सच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या फ्रेंच फॅन्सवर हल्ला केला. तर ब्रुसेल्समध्ये मोरक्कोच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला आणि जाळपोळ केली. यावेळी पोलिसांसोबतही त्यांच्या चकमकी घडल्या.

वर्ल्डकमध्ये जोरदार मुसंडी मारणाऱ्या मोरक्कोचा पराभव फॅन्सना सहन झाला नाही. या पराभवानंतर मोरक्कोचे फॅन्स ब्रुसेल्सच्या दक्षिण स्टेशनजवळ गोळा झाले. त्यानंतर मोरक्कोच्या फॅन्सनी मोठ्या प्रमाणावर जाळपोळ केली. तसेच मोरक्कोचे हे समर्थक आणि पोलिसांमध्येही चकमकी घडल्या. या हिंसक जमावाने पोलिसांवर फटाके टाकले. त्यानंतर पोलिसांनाही वॉटर कॅननचा वापर करावा लागला. पोलिसांनी मोरक्कोच्या काही फॅन्सनाही अटक केली.

फ्रान्समधील पॅरिसमध्येही मोरक्कोच्या फॅन्सनी मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला. फ्रान्समध्ये विजयानंतर फॅन्स रस्त्यावर उतरले होते. मात्र अनेक ठिकाणी मोरक्को आणि फ्रान्सच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. फ्रान्स हा मोरक्कोचा संरक्षक देश मानला जातो. त्यामुळे फ्रान्समध्ये मोरक्कोमधील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.

फ्रान्समध्ये फ्रेंच आणि मोरक्कोचे फॅन्स आमनेसामने आले. अनेक ठिकाणी हिंसक हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी वॉटर कॅनन आणि टियर गॅसचा वापर करावा लागला. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.    

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Internationalआंतरराष्ट्रीयFranceफ्रान्स