शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2022: ३६ मिनिटांत ४ गोल, दक्षिण कोरियाचा धुव्वा उडवत ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 09:28 IST

FIFA World Cup 2022: पाचवेळच्या विश्वचषक विजेत्या ब्राझीलच्या संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाला ४-१ ने पराभूत करून फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलचा सामना क्रोएशियाशी होणार आहे.

पाचवेळच्या विश्वचषक विजेत्या ब्राझीलच्या संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाला ४-१ ने पराभूत करून फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलचा सामना क्रोएशियाशी होणार आहे. क्रोएशियाने उपउपांत्यपूर्व फेरीत जपानचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला होता. दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीत ब्राझीलने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि सुरुवातीलाच एकापाठोपाठ एक असे चार गोल पहिल्या ३६ मिनिटांमध्ये केले.

ब्राझीलकडून पहिला गोल विनिशियस ज्युनियर याने केला. विनिशियस ज्युनियरने सामन्यातील सातव्या मिनिटाला जबरदस्त गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १३व्या मिनिटाला नेयमारने गोल करून ब्राझीलची आघाडी २-० अशी वाढवली. मग २९व्या मिनिटाला रिचर्लिसनने गोल करून ही आघाडी ३-० अशी भक्कम केली. तर त्यानंतर काही मिनिटांनी ३६ व्या मिनिटाला लुकस पकेटाने गोल करून ब्राझीलला ४-० असे आघाडीवर नेले आणि संघाचा विजय निश्चित केला.

सामन्यात मध्यांतरापूर्वीच ब्राझीलचा संघा ४-० अशा आघाडीवर पोहोचला. त्यानंतर सामन्याच्या उत्तरार्धात दक्षिण कोरियाने पुनरागमन करण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र ब्राझिलचा गोलरक्षक एलिसन याने ते निष्फळ ठरवले. पण ७६ व्या मिनिटाला पाईक सियुंगने गोल करून दक्षिण कोरियाचे खाते उघडले. त्यानंतर मात्र कोरियन संघाला आणखी गोल करता आला नाही.  दरम्यान, आजचा विजय ब्राझीलच्या संघाने सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले महान फुटबॉलपटू पेले यांना समर्पित केला.

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Brazilब्राझीलSouth Koreaदक्षिण कोरिया