मुंबई - फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा ज्वर चांगलाच चढू लागला आहे. इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना आज ( बुधवारी ) होणार आहे. आपापल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहतेही जोर लावत आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी हे चारते कोणत्याही थराला जाण्याची तयारी राखतात. एका चाहत्याने तर चक्क इंग्लंडचा बचावपटू हॅरी मॅग्वार याच्या चेह-याचा टॅटू आपल्या छातीवर गोंदवला आहे.
Fifa football World Cup 2018 : जबरा फॅन : छातीवर गोंदवला आवडत्या खेळाडूचा टॅटू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 18:22 IST