शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
4
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
5
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
6
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
7
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
8
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
9
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
10
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
12
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
13
श्रावनात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
14
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
15
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
16
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
17
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
18
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
19
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
20
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?

FIFA World Cup 2018: स्वित्झर्लंडने ब्राझीलला 1-1 बरोबरीत रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 02:12 IST

फिफा विश्वकप स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत स्वित्झर्लंडने ब्राझीलला १-१ बरोबरीत रोखले.

रोस्तोव्ह आन दोन : फिफा विश्वकप स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत स्वित्झर्लंडने ब्राझीलला १-१ बरोबरीत रोखले. ब्राझीलतर्फे फिलिपे काउटिन्होने (१७ वा मिनिटं) तर स्वित्झर्लंडतर्फे स्टीव्हन झुबेर (५० वा मिनिटं) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. पाचवेळा जेतेपदाचा मान मिळवणा-या ब्राझीलला अखेर १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले.  मध्यंतरापर्यंत ब्राझीलने १-० अशी आघाडी घेतली होती.त्याआधी जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये समावेश असलेल्या ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमार फिटनेसबाबतच्या साशंकता दूर करीत आज मैदानात उतरला. गॅब्रियल जीससच्या साथीने त्याने सुरुवातीला काही चांगल्या चाली रचल्या, पण त्याला गोल नोंदवता आला नाही. गेल्या विश्वकप स्पर्धेत जर्मनीविरुद्ध उपांत्य फेरीत ७-१ ने लाजिरवाणा पराभव स्वीकारणा-या ब्राझीलने आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला.ब्रेकला एक मिनिटाचा अवधी शिल्लक असताना नेमारला गोल नोंदवण्याची चांगली संधी होती, पण थियागो सिल्वाच्या पासवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविण्यात तो अपयशी ठरला. जगातील सर्वांत महागडा खेळाडू असलेल्या नेमारला पहिल्या हाफमध्ये स्विस खेळाडूंनी जखडून ठेवले होते.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलBrazilब्राझीलSwitzerlandस्वित्झर्लंड