शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
2
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
3
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
4
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
5
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
6
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
7
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
8
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
9
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
10
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
11
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
12
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
13
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
14
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
15
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
16
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
17
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
18
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
19
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
20
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

Fifa World Cup 2018 : स्पेनच्या दिग्गजांकडे छाप सोडण्याची अखेरची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:56 AM

प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये संघर्ष करणाऱ्या स्पेनच्या सुवर्णमय पिढीतील उर्वरित स्टार खेळाडू कदाचित आपल्या अखेरच्या विश्वकप स्पर्धेत छाप सोडण्याच्या निर्धाराने सहभागी होतील.

माद्रिद : प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये संघर्ष करणाऱ्या स्पेनच्या सुवर्णमय पिढीतील उर्वरित स्टार खेळाडू कदाचित आपल्या अखेरच्या विश्वकप स्पर्धेत छाप सोडण्याच्या निर्धाराने सहभागी होतील.नवे प्रशिक्षक युलेन लोपेटेगुई संघाला विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवून देईल किंवा नाही, अशी साशंकता होती, पण स्पेन संघ इटलीसारख्या संघाला पिछाडीवर सोडत विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवण्यात यश मिळवले. लोपेटेगुईने उदयोन्मुख प्रतिभा व अनुभव याचे योग्य मिश्रण करीत संघाला सलग ११ व्यांदा विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवून दिले. लोपेटेगुईने दिग्गज गोलकिपर इकेर कासिलासच्या स्थानी डेव्हिड डी गियाला संधी दिली. गिया याने मॅन्चेस्टर युनायटेड व राष्ट्रीय संघातर्फे चमकदार कामगिरी करीत लक्ष वेधले होते.युरो २०१६ दरम्यान कासिलासला प्रथमच राखीव खेळाडूंमध्ये बसविण्यात आले. त्याला आता विश्वकप संघातही स्थान मिळाले नाही. सार्जियो रामोस व गेरार्ड पिक यांच्यासारख्या दिग्गज डिफेंडर्सचा कदाचित हा अखेरचा विश्वकप राहील. या दोघांनी संघाला प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळीही संघाला यांच्याकडून चमकदार कामगिरीची आशा आहे.३१ वर्षीय पिक याची विश्वकपनंतर स्पेनकडून न खेळण्याची योजना आहे तर ३२ वर्षीय रामोस आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारण्याची शक्यता आहे. विश्वकप स्पर्धेला प्रारंभ होईल त्यावेळी मिडफिल्डर आंद्रेस इनिएस्ता ३४ वर्षांचा झालेला असेल आणि संघ या दिग्गजाला जेतेपदासाठी निरोप देण्यास प्रयत्नशील राहील.इनिएस्ता आपल्या पास व चेंडूवरील नियंत्रणासाठी ओळखल्या जातो. स्पेन संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने तीन प्रतिष्ठेच्या स्पर्धांमधील विजेतेपदक पटकावले आहे. २०१० च्या विश्वकप फायनलमध्ये नेदरलँडविरुद्ध त्याने विजयी गोल नोंदवला होता. (वृत्तसंस्था)स्पेनला २००८ ते २०१२या कालावधीत रोखणे जवळजवळ अशक्य झाले होते आणि या कालावधीत संघाने दोन युरोपियन चॅम्पियनशिप व विश्वविजेतेपद पटकावले होते. पण, २०१४ विश्वकप स्पर्धेपासून संघाच्या निराशाजनक कालखंड सुरू झाला. संघाला साखळी फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही आणि युरो २०१६ मध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

 रस्रंल्ल्र२ँ ॅ्रंल्ल३२ ँं५ी ३ँी ’ं२३ ूँंल्लूी ३ङ्म ’ीं५ी ३ँी्र१ ें१‘

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल