शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018: बेल्जियम बाद फेरीत; दुसऱ्या पराभवामुळे ट्यूनेशियाचं पॅकअॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 22:14 IST

बेल्जियमचा ट्यूनेशियावर 5-2 असा दणदणीत विजय

मॉस्को : कर्णधार ईडन हेजार्ड आणि रोमेलु लुकाकू यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बेल्जियमनं ट्यूनेशियाचा पराभव केला आहे. ट्यूनेशियाचा 5-2 असा धुव्वा उडवत बेल्जियमनं पुढील फेरीत प्रवेश केला आहे. ट्यूनेशियाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागल्यानं त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. जी गटातील हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी बेल्जियमला या सामन्यात विजय आवश्यक होता. तर ट्यूनेशियाला स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी विजय गरजेचा होता. सामन्याला सुरुवात होताच बेल्जियमचा कर्णधार ईडन हेजार्डनं सहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवला. यानंतर लुकाकूनं 16 व्या मिनिटाला गोल डागत संघाला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. ट्यूनेशियाच्या डेलन ब्रोननं 18 व्या मिनिटाला गोल करत बेल्जियमची आघाडी 2-1 नं कमी केली. मात्र यानंतर ट्यूनेशियाच्या पदरी निराशाच आली. पहिलं सत्र संपण्याआधी लुकाकूनं पुन्हा एकदा ट्यूनेशियाचा बचाव भेदला. त्यामुळे बेल्जियमला 3-1 अशी आघाडी मिळाली. दुसऱ्या सत्राला सुरुवात होताच बेल्जियमनं आक्रमक खेळ सुरु केला. ईडन हेजार्डनं 51 व्या मिनिटाला सामन्यातील स्वत:चा दुसरा, तर संघाचा चौथा गोल नोंदवला. यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. अखेर 90 व्या मिनिटाला बेल्जियमच्या मिती बात्शुयाईला गोल करण्यात यश आलं. त्यामुळे बेल्जियमनं 5-1 अशी आघाडी मिळवली. यानंतर तीनच मिनिटांनी ट्यूनेशियाचा कर्णधार वाहबी खाजरीनं गोल नोंदवला. ईडन हेजार्ड आणि रोमेलु लुकाकू यांच्या दमदार खेळामुळे बेल्जियमनं पुढील फेरीत धडक मारली आहे. तर सलग दुसऱ्या पराभवामुळे ट्यूनेशियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८russiaरशिया