शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018 : स्टार फुलबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीची रोमांचक लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 13:05 IST

अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचं रोमॅंटिक लाइफ फारच रोमांचक आहे. त्यांची लव्हस्टोरी फारच कमी लोकांना माहीत आहे.

जगभरातील फुटबॉल प्रेमींना आणि फुटबॉल न आवडणाऱ्यांनाही मेस्सी हा ओळखीचा आहे. मेस्सीचा संघ फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर झाली असली तरी त्याची चर्चा मात्र कधीच कमी होत नाही. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचं रोमॅंटिक लाइफ फारच रोमांचक आहे. त्यांची लव्हस्टोरी फारच कमी लोकांना माहीत आहे. पण ही त्याची लव्हस्टोरी कोणत्याही सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाहीये. 

मेस्सी हा चाहत्यांमध्ये एक फारच लाजरा व्यक्ती म्हणून लोकप्रिय आहे. पण हे फार कमी लोकांना माहीत आहे की, मेस्सी हा रिअल लाइफमध्ये फार बोल्ड आणि रोमॅंटिक व्यक्ती आहे. चला जाणून घेऊया मेस्सीची रोमांचक लव्हस्टोरी....

मेस्सी हा फार यशस्वी खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याचं स्वच्छ करिअर हे त्यांच्या यशाचं मुख्य कारण सांगितलं जातं. स्टार खेळाडूंच्या वेगवेगळ्या अफेअरबाबत नेहमी चर्चा होत असते. पण मेस्सीचा आजपर्यंत केवळ एका मुलीवर जीव जडलाय. ती म्हणजे मॉडल एंटोनेला रोकुजो. 

आपल्या देशासाठी सर्वात जास्त गोल करणाऱ्या मेस्सीवर जगभरातील लाखों तरुणी जीव ओवाळतात. पण मेस्सी हा एंटोनेलावर फिदा आहे. अनेकवर्ष लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मेस्सीने आपली लव्हस्टोरी एका रेडिओवर सांगितली होती. 

मेस्सी आणि एंटोनेलो हे एकमेकांना पाच वर्षांचे असतानापासून ओळखतात. आणि 20 वय असतानापासून एकमेकांना डेट करत होते. दोघांचं लग्नही फार साध्या पद्धतीने झालं. महत्वाची बाब त्यांनी त्यांचं वेडिंग गिफ्ट म्हणून लियो मेस्सी फाऊंडेशनला डोनेशन करण्याचा निर्णय घेतला होता. 

लग्नाआधी मेस्सी आणि त्यांची पत्नी एंटोनेलो हे लिव्ह इनमध्ये राहत होते. लग्नाआधीच त्याच्या दोन मुलांनी जन्म घेतला होता. त्याच्या दोन मुलांची नावे थियागो आणि मेटियो अशी आहेत. मेस्सी त्याच्या प्रेयसीची गर्भवती होण्याची कहाणीही एका वेगळ्याच अंदाजात सांगितली होती. 

2012 मध्ये एका सामन्यात मेस्सीने हॅट्रिक लगावली होती. आपल्या या हॅट्रिकवर तो आनंदाने नाचत होता. यावेळी अचानक त्याने बॉल आपल्या टी-शर्टच्या आत ठेवला. मेस्सीचं हे असं करणं अनेकांना बुचकळ्यात टाकणारं होतं. पण नंतर तो बाबा होणार हे सर्वांना कळालं होतं. 

मेस्सीच्या जवळचे लोक सांगतात की, मेस्सी तसा फार शांत आणि लाजऱ्या स्वभावाचा आहे. पण जेव्हापासून त्याच्या लाइफमध्ये एंटोनेलो रोकुजोने एन्ट्री घेतली तेव्हापासून तो फारच मोकळेपणाने आपलं आयुष्य जगतो आहे.  

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीFootballफुटबॉल