शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
4
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
5
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
6
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
7
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
8
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
9
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
10
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
11
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
12
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
13
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
14
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
15
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
16
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
17
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
18
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
19
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
20
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत

FIFA World Cup 2018 : फुटबॉलच्या आकाराच्या बंगाल्यात राहतोय मेस्सी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 4:21 PM

विमानातून मेस्सीचे घर पाहिल्यास ते एक फुटबॉलचे मैदान असल्यासारखे वाटते. पण ते मैदान नसून फुटबॉल मैदानाच्या आकाराचे शानदार घर आहे.

ठळक मुद्दे हा बंगला पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे. वरुन पाहिल्यास चारही बाजूंनी दाट हिरवळ दिसते.

सचिन कोरडे : आपल्या जादुई खेळाने जगभरातील चाहत्यांना वेड लावणारा फुटबॉलपटू म्हणजे लियानेल आंद्रेस मेस्सी. खेळच नव्हे तर त्याची लाईफस्टाईलही अनेकांना भावते. मेस्सीचे शौकही काही कमी नाहीत. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, की मेस्सीच्या घरावरुन विमानाला जाण्यास सुद्धा बंदी आहे. कारण मेस्सीचे घर पर्यावरण प्रतिबंधित क्षेत्रात आहे. त्यामुळेच स्पॅनिश एअरलाईन्सला बार्सिलोना विमानतळाचा विस्तार करता आलेला नाही. पर्यावरण नियमांच्या कारणामुळे या जागेतून विमानाचे उड्डाण होणे शक्य नाही. एअरलाईन्सने यासाठी मेस्सी याला दोषी मानले आहे. पण मेस्सीचा बंगलाही भुरळ घालणाराच आहे...

मैदान नव्हे घर...

विमानातून मेस्सीचे घर पाहिल्यास ते एक फुटबॉलचे मैदान असल्यासारखे वाटते. पण ते मैदान नसून फुटबॉल मैदानाच्या आकाराचे शानदार घर आहे. मेस्सीचा हा बंगला अत्याधुनिक सुविधांनी नटलेला आहे. हा बंगला पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे. वरुन पाहिल्यास चारही बाजूंनी दाट हिरवळ दिसते. जगप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ लुईस दी गॅरीदो याने हा बंगला साकारलाय. गॅरीदोने वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन मेस्सीपुढे ठेवले होते. त्यातून मेस्सीने याची निवड केली. मेस्सीचा जन्म हा अर्जेटिनात झाला असला तरी बार्सिलोनात घर बांधण्याचे त्याचे स्वप्नं होते. या बंगल्याची किंमत ही ७ मिलियन युरो इतकी आहे. पण मेस्सीसाठी ती फार कमीच. कारण या खेळाडूची कमाईच ही २३० मिलियन युरोजच्या जवळपास आहे.

बालमैत्रिणीशी विवाह

 अर्जेटिनाचा खेळाडू मेस्सी याने २०१७ मध्ये त्याची बालमैत्रिण आणि गर्लफेंड एंटोनेला रोकोजो हिच्यासोबत विवाह केला. हे दोघेही एकमेकांचे शेजारी होते. वयाच्या ५ व्या वर्षी मेस्सीने रोकोजो हिल्या पहिल्यांदा पाहिले. त्यानंतर वयाच्या १३ व्या वर्षी तो बार्सिलोनाला निघून गेला. तेव्हापासून ते एकमेकांच्या अधिक संपर्कात होते. दोघेही प्रेमात पडले. २००८ मध्ये ते सोबतच राहायचे. लग्नापूर्वीच त्यांना दोन मुलेही झाली होती. 

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलrussiaरशियाArgentinaअर्जेंटिना