शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

FIFA World Cup 2018: ‘थकलेल्या’ जर्मनीपुढे लौकिक राखण्याचे आव्हान

By सचिन खुटवळकर | Updated: June 19, 2018 21:21 IST

ओझिल, म्युलर, क्रुस, खेदिरा हे सर्वजण मेक्सिकन बचाव भेदण्यात अपयशी ठरले. ओझिल गुडघ्याच्या दुखण्यातून नुकताच सावरत असून म्युलर, खेदिरा यांच्या खेळावर वयाचा तसेच शारीरिक थकव्याचा परिणाम दिसून आला.

ठळक मुद्देआता जर्मनीची गाठ स्वीडन व दक्षिण कोरियाशी पडणार आहे. पुढील फेरीत पोहोचण्याबरोबरच स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी हे दोन्ही सामने जिंकावे लागतील.

सचिन खुटवळकर :  गतविजेत्या जर्मनीला तुलनेत कमी वलय असलेल्या मेक्सिकोने फुटबॉल विश्वचषकातील पहिल्या सामन्यात १-0 असे पराभूत करून आश्चर्याचा धक्का दिला. एकापेक्षा एक अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या जर्मनीचा मेक्सिकोपुढे टिकाव न लागल्याने खुद्द मेक्सिकन फुटबॉलप्रेमीच अचंबित झाले. या पराभवामागे जर्मन खेळाडूंच्या शारीरिक थकव्याचे कारण दिले जात आहे. ओझिल, म्युलर, क्रुस, खेदिरा हे सर्वजण मेक्सिकन बचाव भेदण्यात अपयशी ठरले. ओझिल गुडघ्याच्या दुखण्यातून नुकताच सावरत असून म्युलर, खेदिरा यांच्या खेळावर वयाचा तसेच शारीरिक थकव्याचा परिणाम दिसून आला. एकूणच विश्वचषकापूर्वी जवळपास अर्धा डझन सामने गमावणाऱ्या जर्मनीचे मानसिक खच्चीकरणच त्यांना मेक्सिकोसारख्या संघाविरुद्ध पराभवाचे कारण ठरले.

अपयशाचे खापर...

- या पराभवामुळे प्रशिक्षक ज्योकिम लो संघावर नाराज झाले आहेत. आम्ही आमच्या ठरलेल्या व्यूहरचनेनुसारच अखेरपर्यंत खेळत होतो. पहिल्या सत्रानंतर त्यात बदल करण्यात आम्ही अपयशी ठरलो, असे ते म्हणाले.

- जर्मन फॉरवर्ड ओझिल व म्युलर अखेरपर्यंत आपल्या नेहमीच्या वेगवान चाली रचण्यात यशस्वी ठरले नाहीत. मेक्सिकन बचावाचे उत्तर त्यांच्याजवळ नव्हते.

- जर्मनीच्या अतिबचावात्मक पवित्र्यानंतरही मेक्सिकोच्या फॉरवर्डनी अनेकदा जर्मन गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली. त्यातच मेक्सिकोतर्फे एकमेव गोल नोंदविण्यात आला.

- या मानहानिकारक पराभवानंतर जर्मन मीडिया भडकला. पराभवासाठी प्रशिक्षक लो यांच्यासह आघाडीच्या खेळाडूंचा आळशीपणा कारणीभूत ठरल्याचे टीकास्त्र सोडण्यात आले.

- आता जर्मनीची गाठ स्वीडन व दक्षिण कोरियाशी पडणार आहे. पुढील फेरीत पोहोचण्याबरोबरच स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी हे दोन्ही सामने जिंकावे लागतील.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Germanyजर्मनीFootballफुटबॉलrussiaरशिया