शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018: मनीमाऊ खाणार वाटीतला खाऊ; हळूच सांगणार कोण जिंकणार भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 17:07 IST

तुम्ही जर फुटबॉल विश्वचषकाशी संबंधित कोणती पैज लावणार असाल, तर जरा थांबा. कारण तुम्हाला अचूक निकाल सामन्यापूर्वी समजू शकतो. यामध्ये कुठलीही सट्टेबाजी किंवा फिक्संग अजिबात नाही.

ठळक मुद्देयावेळी एक पांढरी शुभ्र मांजर रशियामधल्या फुटबॉलच्या सामन्यांचा अचूक निकाल सांगणार आहे.

मॉस्को : फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर काही दिवसांत चढायला लागेल. त्यानंतर कोणता देश फुटबॉल विश्वचषक जिंकेल, अशा बऱ्याच जणांमध्ये पैजा लागतील. तुम्ही जर अशीच कोणती पैज लावणार असाल, तर जरा थांबा. कारण तुम्हाला अचूक निकाल सामन्यापूर्वी समजू शकतो. यामध्ये कुठलीही सट्टेबाजी किंवा फिक्सिंग अजिबात नाही. तर यावेळी एक मांजर सामन्यांचा अचूक निकाल सांगणार आहे.

आठ वर्षांपूर्वी, म्हणजेच 2010 साली एक ऑक्टोपस होता, जो सामन्यांचे अचूक निकाल सांगत होता. या विश्वचषकात स्पेन जिंकेल, असे भाकीत या ऑक्टोपसने केले होते, ते खरेही ठरले होते. त्यामुळे त्याला ऑक्टोपस बाबा अशीही उपाधी देण्यात आली होती. पण यावेळी एक पांढरी शुभ्र मांजर रशियामधल्या फुटबॉलच्या सामन्यांचा अचूक निकाल सांगणार आहे.

कोण आहे ही मांजर...या मांजरीचं नाव आहे अचिलीस. या मांजरीला फुटबॉल सामन्यांचे भाकित वर्तवण्यासाठी हेरिमीटेज संग्रहालयातून बोलावण्यात आलं आहे. या मांजरीला ऐकू येत नाही. पण तरीदेखील ती या सामन्यांचे अचूक निकाल सांगणार आहे. या सामन्यांचे भाकीत वर्तवण्यासाठी अचिलीसला खास डाईटही देण्यात येणार आहे.

अचिलीस कसे वर्तवणार भाकीत...सामन्यापूर्वी अचिलीससमोर दोन देशांचे झेंडे ठेवले जाणार आहेत. या दोन झेंड्यापुढे दोन वाट्या ठेवल्या जातील. या दोन्ही वाट्यांमध्ये अचिलीससाठी खाऊ ठेवला जाईल. अचिलीस ज्या झेंड्याच्या बाजूला असलेल्या वाटीतला खाऊ उचलेल तो देश विजयी ठरेल.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉलrussiaरशिया