शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

FIFA वर्ल्डकपचा फिव्हर! फक्त सामने पाहण्यासाठी 17 मुलांनी खरेदी केले 23 लाखांचे घर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 14:49 IST

FIFA world cup : फिफा विश्वचषकात सहभागी झालेले 32 संघ कतारमध्ये पोहोचले आहेत.

फिफा विश्वचषक सुरू झाला आहे. फिफा विश्वचषकात सहभागी झालेले 32 संघ कतारमध्ये पोहोचले आहेत. तसेच, फिफा विश्वचषकाचा आनंद घेण्यासाठी जगातील दहा लाखांपेक्षा जास्त फुटबॉलप्रेमी कतारमध्ये येण्याची शक्यता आहे. भारतातही फूटबॉल चाहत्यांची कमी नाही. दरम्यान, फिफा विश्वचषकाची क्रेझ केरळमध्ये पाहायला मिळत आहे. येथील मुलांच्या एका ग्रुपने फिफा विश्वचषकातील सामने पाहण्यासाठी जवळपास 23 लाख रुपयांचे घर खरेदी केले आहेत.

दरम्यान, जगभरातील प्रेक्षक फिफा विश्वचषक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. याच पार्श्वभूमीवर केरळमधून हे प्रकरण समोर आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही मुलांनी खरेदी केलेल्या घराचे फोटो शेअर केले आहेत. या मुलांना पाहून सगळेच किती उत्साहात आहेत, असे वाटते. केरळमधील कोची येथील मुंडक्कमुगल गावातील 17 मुलांनी हा पराक्रम केल्याचे सांगण्यात आले. एकत्र बसून निवांतपणे सामना लाइव्ह पाहता यावा म्हणून त्यांनी हे सर्व केले.

मिळालेल्या माहितीनुसार, या घरात 32 संघांचे झेंडेही लावण्यात आले आहेत. यासोबतच मेस्सी आणि रोनाल्डोसारख्या खेळाडूंचे मोठे पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. यानंतर या घरात सगळ्यांना एकत्र सामना पाहता यावा यासाठी या घरात मोठ्या स्क्रीनचा टेलिव्हिजन लावण्यात आला आहे. या घराच्या खरेदीदारांपैकी एका मुलाने एएनआयला सांगितले की, फिफासाठी काहीतरी खास करण्याची योजना आखली होती आणि ती प्रत्यक्षात आणली आहे.

येथे कोणीही सामना पाहू शकतोयाचबरोबर, फुटबॉल विश्व पाहण्याची ही परंपरा आमचे लोक अनेक वर्षांपासून करत आहेत, मात्र यावेळी आम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आणि हे घर विकत घेतले. आम्ही 17 जणांनी मिळून 23 लाख रुपयांना घर घेतले. येथे कोणीही येऊन सामना पाहू शकतो. कोणावरही बंधन नाही आणि भविष्यातही ही परंपरा कायम राहावी अशी आमची इच्छा आहे, असे संबंधित मुलाने सांगितले. 

यजमान कतारचा पहिल्याच सामन्यात पराभव; इक्वेडोर फुटबॉल सामना जिंकलाउद्घाटनानंतर पहिलाच सामना यजमान कतार आणि इक्वेडोरमध्ये खेळविण्यात आला. हा सामना इक्वेडोरने 2-0 जिंकला असून कतारचा दारुण पराभव झाला आहे. एनर व्हलेनसियाच्या दोन गोल नोंदविले. याच गोलच्या जोरावर इक्वेडोरने 2-0 अशा फरकाने यजमान कतारवर विजय मिळवला. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात यजमान प्रथमच हरले. यापूर्वी वर्ल्ड कपच्या 22 लढतीत एकाही यजमानांना हार मानावी लागली नव्हती. यापूर्वीच्या 21 वर्ल्ड कप स्पर्धेत 20 वेळा यजमान देशाने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. यजमानपद मिळवताना प्रथमच खेळणारा कतार हा तिसरा देश ठरला. यापूर्वी उरुग्वे ( 1930) व इटली (1934) यांनी यजमानपद भूषवण्यासोबतच प्रथमच वर्ल्ड कप खेळला होता.

टॅग्स :FootballफुटबॉलKeralaकेरळFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Jara hatkeजरा हटके