शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : नाचोss...क्रोएशियाच्या फुटबॉलपटूंसोबत राष्ट्रपतींनी धरला ठेका, पाहा VIDEO 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 13:12 IST

कोलिंडा ग्रेबर कित्रोविक क्रोएशियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत.

नवी दिल्ली - काल झालेल्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील दुसऱ्या उपान्त्य लढतीत क्रोएशियाने इंग्लंडचा 2-1 च्या फरकाने पराभूत करत प्रथमच अंतिम फेरी गाठली. 15 जुलै रोजी क्रोएशिया आणि बलाढ्य फ्रान्स यांच्यामध्ये जेतेपदासाठी लढत होईल.  क्रोएशियाने पहिल्यांदाच फिफा विश्‍वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. इंग्लंडबरोबर झालेल्या सामन्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये क्रोएशियाच्या संघाने विजय साजरा केला. यावेळी त्यांनी डान्सही केला. विषेश म्हणजे, संघाच्या विजयी सेलिब्रेशनमध्ये क्रोएशियाच्या राष्ट्रपतीही सहभागी झाल्या होत्या. खेळाडूंसोबत राष्टपतींनीही ठेका धरला होता. सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. 

फिफा विश्‍वचषक स्पर्धेत क्रोएशियाच्या राष्ट्रपती कोलिंडा ग्रेबर कित्रोविक चांगल्याच चर्चेत राहिल्या. सामने पाहण्यासाठी चार्टेर प्लेनने येऊ शकणाऱ्या कोलिंडा इकॉनोमी क्लासने आल्या. सर्वसामान्या लोकांसोबत त्यांनी फूटबॉल विश्वचष्काचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी सर्वसामान्य लोकांशी संवाद तर साधलाच शिवाय मनोसोक्त सेल्फीही काढल्या. 

कोलिंडा ग्रेबर कित्रोविक क्रोएशियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. VVIP असूनही त्या सर्वसामान्य व्यक्तीसारख्या राहत असतात. फीफा विश्वचषकातही त्यांचा हाच अंदाज पहायला मिळाला. आपला संघ अंतिम फेरीत पोहचल्याने खेळाडूसोबत त्यांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. त्या बेफिकीर होऊन खेळाडूंसोबत आनंदात सहभागी झाल्या.  

 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८