शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : बारा वर्षांपूर्वी अन् याच दिवशी... सेम टू सेम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 03:21 IST

1 जुलै 2006 मध्ये अशाच एका संघासाठी गोलरक्षक हिरो ठरला होता आणि बरोबर 12 वर्षांनी त्याच दिवशी त्या कामगिरीची पुनरावृत्ती झाली.

मॉस्को - रशियात सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल सामन्यात रविवारी  गोलरक्षक डॅनिजेल सुबासिचने पेनल्टी शूटआऊटमध्ये रंगलेल्या थरारक सामन्यात तीन अप्रतिम बचाव करून क्रोएशियाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिऴवून दिला. क्रोएशियाने 3-2 ( 1-1) अशा फरकाने डेन्मार्कचे कडवे आव्हान परतवून लावले. 1998 नंतर क्रोएशियाची विश्वचषक स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. फ्रान्समध्ये झालेल्या त्या स्पर्धेत पदार्पणात उपांत्य फेरीत प्रवेश केला होता आणि त्यापेक्षा सरस कामगिरी करण्याचे लक्ष्य त्यांना खुणवत आहे. त्यांच्या मार्गात यजमान रशियाचे आव्हान असणार आहे.

मात्र रविवारी सुबासिचची ही कामगिरी इतिहासाला उजाळा देणारी ठरली. पेनल्टी शूटआऊटमध्ये सुबासिचने डेन्मार्कच्या तीन खेळाडूंचे प्रयत्न अपयशी ठरवले. 1 जुलै 2006 मध्ये अशाच एका संघासाठी गोलरक्षक हिरो ठरला होता आणि बरोबर 12 वर्षांनी त्याच दिवशी त्या कामगिरीची पुनरावृत्ती झाली. असे काय घडले होते ते जाणून घेऊया... 1 जुलै 2006 साली जर्मनीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व  फेरीत पोर्तुगाल वि. इंग्लंड यांच्यातील ती लढत निर्धारित कालावधीत गोलशून्य बरोबरीत सुटली होती. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल ताणला गेला. गोलरक्षक रिकार्डोने इंग्लंडच्या लॅम्पार्ड, गेरार्ड आणि कॅराघेर असे तीन प्रयत्न रोखून पोर्तुगालला 3-1 असा विजय मिळवून दिला होता. शूटआऊटमध्ये तीन बचाव करणारा तो पहिला गोलरक्षक ठरला होता आणि त्याच तारखेला सुबासिचने त्याच कामगिरीची बरोबरी केली. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Croatiaक्रोएशियाDenmarkडेन्मार्कFootballफुटबॉलSportsक्रीडा