मॉस्को - कायलीन मॅब्प्पे आणि नेयमार हे पॅरीस सेंट जर्मेन क्लबमधील सहकारी खेळाबरोबर अभिनयाचे धडेही एकत्र गिरवत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. फिफा विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सचा मॅब्प्पे काही कारण नसताना पेनल्टी क्षेत्राच्या सीमेवर पडला आणि उरूग्वेच्या रॉड्रीगेजला काय झाले हेच कळले नाही. फ्रान्सने 2-0 अशी आघाडीनंतर मॅब्प्पेचे हे कृत्य वेळ वाया घालवण्यासाठीचे होते. त्यामुळे उरूग्वेचे खेळाडू प्रचंड वैतागले आणि सामन्यातील वातावरण तापले. पंचांनी मॅब्प्पे व रॉड्रीगेज या दोन्ही खेळाडूंना पिवळे कार्ड दाखवले.मॅब्प्पेच्या या कृत्याची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. त्याचे हे कृत्य सतत नेयमारची आठवण करून देत होते. मेक्सिकोविरूद्घच्या लढतीत नेयमारने असेच पाय दुखण्याचे नाट्य करून बराच वेळ वाया घालवला होता. त्यानंतर त्याच्यावर बरीच टीका झाली. त्यानंतर मॅब्प्पेच्या रडीच्या डावानंतर नेयमार पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नेयमारनेच मॅब्प्पेला मैदानावरील अभिनयाचे धडे दिले असतील, अशी टिंगल उडवण्यात येत होती.
FIFA Football World Cup 2018 : नेयमार म्हणतो, मैदानात तुम्हाला अभिनय पण करायला हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 08:00 IST