शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : मेक्सिकोचा कोरियावर विजय, गटात अव्वल स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 23:19 IST

फिफा विश्वचषकात ग्रुप एफमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या मेक्सिकोने कोरिया रिपब्लिकचा २-१ने पराभव केला. या विजयासह मेक्सिकोचे सहा गुण असून त्यांचा बाद फेरीतील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे

रोस्तोव आॅन डॉन : फिफा विश्वचषकात ग्रुप एफमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या मेक्सिकोने कोरिया रिपब्लिकचा २-१ने पराभव केला. या विजयासह मेक्सिकोचे सहा गुण असून त्यांचा बाद फेरीतील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. तर कोरियाचे आव्हान स्पर्धेच्या साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. रोस्तोव अरेनात झालेल्या या सामन्यात मेक्सिकोच्या वेला कार्लोस (२६ मिनिट) आणि झेवियर हर्नान्डेझ (६६ मिनिट) यांनी गोल केले. तर दुसऱ्या हाफनंतर अतिरिक्त वेळेत कोरियाच्या एच.एम. सन याने गोल करत पराभवाचे अंतर कमी केले.या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये मेक्सिकोच्या संघाने चांगलेच वर्चस्व गाजवले. मेक्सिकोने कोरियाच्या बचाव फळीला भेदत गोल करण्याचे चांगले प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळत नव्हते. कोरियाच्या एच.एस. जँग याने पेनल्टी बॉक्समध्ये हॅण्डबॉल केला. त्यामुळे मेक्सिकोला पेनल्टी बहाल करण्यात आली. कारकिर्दीतील ७० वा सामना खेळणाºया कार्लोस वेला याने पेनल्टी घेतली आणि गोल करत मेक्सिकोला आघाडी मिळवून दिली. पहिला हाफ संपला तेव्हा मेक्सिको १-० ने आघाडीवर होता.

विश्वचषक २०१८ मध्ये आतापर्यंत एकूण १४ पेनल्टी झाल्या आहेत. तर २०१४ च्या विश्वचषकात फक्त १३ पेनल्टी झाल्या होत्या.दुस-या हाफच्या सुरूवातीपासूनच मेक्सिकोच्या संघाने पुन्हा कोरियाच्या गोलपोस्टवर जोरदार आक्रमणाला सुरुवात केली. ६६ व्या मिनिटाला झेवियर हर्नांन्डेझ याने गोल करत आघाडी दुप्पट केली. या हाफमध्ये कोरियाच्या संघाने काहीसा धसमुसळा खेळ केला. त्यामुळे कोरियाच्या चार खेळाडूंना पिवळे कार्ड मिळाले. दुसºया सत्रानंतर अतिरिक्त वेळेत कोरियाच्या एच.एम. सन याने गोल करत पराभवाचे अंतर कमी केले.

मेक्सिकोने बॉलवर ५९ टक्के नियंत्रण राखले तसेच गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. दोन सामन्यातील दोन विजयानंतर सहा गुणांसह मेक्सिको अव्वल स्थानावर आहे. तर कोरियाच्या संघाने दोन्ही सामन्यात पराभव पत्करल्याने त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.  कोरियाचा साखळी फेरीतील अखेरचा सामना २७ जून रोजी जर्मनीविरोधात होणार आहे. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Mexicoमेक्सिको