शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

FIFA Football World Cup 2018 : ज्योकिम ल्यो तुम्हीच जर्मनीला तारु शकता... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 09:00 IST

साहजिकच जर्मनीच्या या लाजिरवाण्या कामगिरीला जबाबदार ठरवून प्रशिक्षक ज्योकिम ल्यो यांच्या हकालपट्टीचा सूर आवळला जाईल.

ठळक मुद्देपुन्हा संघबांधणी करण्याचे काम नव्या प्रशिक्षकाला जमण्यासारखे नाही, म्हणूनच ज्योकिम ल्यो तुम्हीच जर्मनीला तारु शकता, अन्य कुणालाही ते काम झेपण्यासारखे नाही.

स्वदेश घाणेकर : दक्षिण कोरिया सारख्या दुबळ्या संघाकडून रशियात गतविजेत्या जर्मनीचा झालेला मानहानीकारक पराभव हा फुटबॉलचा दर्दी चाहता असलेल्या प्रत्येकासाठी बोचरा होता. मेक्सिको विरूध्दच्या सलामीच्या पराभवातूनच जर्मनीचे मानसिक स्थैर्य ठिक नसल्याचे जाणवले होते. पण स्पर्धेतून ते इतक्या वाईट पध्दतीने बाहेर फेकले जातील असे नक्की वाटले नव्हते. साहजिकच या फुटबॉल विश्वचषकातील लाजिरवाण्या कामगिरीला जबाबदार ठरवून प्रशिक्षक ज्योकिम ल्यो यांच्या हकालपट्टीचा सूर आवळला जाईल. पण तो सूर गळ्यातून बाहेर पडण्याआधीच जर्मन फुटबॉल संघटनेने ल्यो २०२२ पर्यंत प्रशिक्षकपदी कायम राहतील असे स्पष्ट करून विरोधाची धार कुचकामी केली. 

जर्मन संघासोबत २००४ पासून असलेल्या ल्यो यांना एका अपयशाने काढून टाकणे संघटनेलाही मान्य नाही. जुर्गेन क्लिन्समन यांच्या सोबत ल्यो यांनी जर्मन संघाचा मजबूत पाया रचला आहे. साहाय्यक प्रशिक्षक असलेल्या ल्यो यांनी क्लिन्समन यांच्या सोबत जर्मनीच्या खेळाची शैली बदलली.  युरो २००४ च्या अपयशानंतर ल्यो यांनी जर्मनीला आक्रमक खेळाची ओळख करून दिली. क्लिन्समन आणि ल्यो यांच्या नव्या आक्रमक फिलोसॉफिने जर्मन संघात कायापालट घडवला. हे कार्य करत असतानाच ल्यो यांच्या सांगण्यावरून जर्मनीचा  'ब' संघाची उभारणी करण्यात आली. नुसती उभारणी करून ते थांबले नाही तर विविध स्पर्धांमध्ये तो संघ अन्य बलाढ्य संघांसमोर उतरवला. यश अपयशातून उभा राहण्यास शिकणाऱ्या त्या संघातून  'अ'  संघासाठी अनेक नावाजलेले खेळाडू दिले. 

क्लिन्समन यांनी करार वाढवण्यास नकार दिल्याने २००६  मध्ये ल्यो यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. एक एक लक्ष्य डोळ्यासमोर ठेउन ल्यो रणनीती आखू लागले आणि हे करत असताना त्यांनी क्लिन्समनसोबतच्या फिलोसॉफित कोणताही बदल केला नाही. चेंडूवर जास्त ताबा ठेवत मग पास देण्याची शैली त्यांनी खंडित केली. कोणत्याही खेळाडूने अधिक काळ चेंडू स्वतःकडे न राखता झटपट पासेस देण्याचा त्यांचा आग्रह असायचा आणि तो ते खेळाडूंकडून प्रत्यक्षात करवून घ्यायचे. त्यामुळेच एवढी वर्षे त्यांचा यशाचा आलेख चढाच राहिला. 

२०१७ च्या कॉन्फडरेशन चषक स्पर्धेत संपूर्ण नवा संघ घेऊन ल्यो मैदानात उतरले. त्यांनी तयार केलेल्या या फळीने काय केले हे सर्वांनी पाहिलेच. जर्मनीने प्रथमच ही स्पर्धा जिंकली. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा उंचावल्या. पण त्यावर ल्यो खरे उतरण्यात अपयशी ठरले. हे त्यांचे एकट्यांचे अपयश नव्हते तर २०१४ च्या जेतेपदामुळे खेळाडूंच्या अहंकाराचेही होते. मेक्सिकोविरूध्दच्या पहिल्याच धक्क्याने हे खेळाडू जमिनीवर आले आणि पुन्हा उठूच शकले नाही. 

या मानहानीकारक पराभवाला ल्यो यांनाच जबाबदार धरून हकालपट्टी करून प्रश्न सुटणार नाही तर ते अधिक गंभीर होतील. कॉन्फडरेशन स्पर्धेत खेळवलेल्या दुसऱ्या फळीतील ते खेळाडू जर्मनीचे भविष्याचे नायक आहेत. त्यांना आकार देण्याचे काम ल्यो यांनी केले आहे आणि त्या हिऱ्यांचे पॉलिशिंगचे कामही तेच करु शकतात. रशियात खेळलेल्या संघातील बहुतेक खेळाडू येत्या दोनएक वर्षात निवृत्ती स्वीकारतील. त्यामुळे पुन्हा संघबांधणी करण्याचे काम नव्या प्रशिक्षकाला जमण्यासारखे नाही, म्हणूनच ज्योकिम ल्यो तुम्हीच जर्मनीला तारु शकता, अन्य कुणालाही ते काम झेपण्यासारखे नाही.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Germanyजर्मनीFootballफुटबॉलrussiaरशियाSportsक्रीडा