शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

FIFA Football World Cup 2018 : गुरूची 'त्याच्या' दु:खावर मायेची फुंकर...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 07:30 IST

कोलंबियाला पेनल्टी शूटआऊटवर नमवल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डच्या दिशेने धाव घेतली. विजयाच्या त्यांच्या आनंदापुढे गगनही ठेंगणे वाटत होते.

ठळक मुद्देबहुतेक 96ला इंग्लंडच्या प्रशिक्षक टेरी व्हेनाब्लेस यांनी दिलेला सल्लाच साऊथगेट यांनी युरीबेला दिला असेल.

मॉस्को - कोलंबियाला पेनल्टी शूटआऊटवर नमवल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डच्या दिशेने धाव घेतली. विजयाच्या त्यांच्या आनंदापुढे गगनही ठेंगणे वाटत होते. पेनल्टी शूटआऊट आणि इंग्लंड यांचे कधीच पटले नाही. महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मागील आठ सामन्यांतील पेनल्टी शूटआऊटमध्ये त्यांचा हा दुसराच विजय होता. त्यामुळे त्याचे महत्व इंग्लंडच्या खेळाडूंच्यापेक्षा दुसरे कुणीच सांगू शकत नव्हते. पण याचवेळी कोलंबियाच्या खेळाडूंच्या मनात किती दु:ख दाटले असेल याची जाण मैदानावर उपस्थित एका व्यक्तीला होती. एकेकाळी ती व्यक्तीही यातून गेली होती. त्यामुळेच विजयाचा आनंद विसरून ती व्यक्ती कोलंबियाच्या खेळाडूंकडे धावली आणि त्यांच्या दु:खावर मायेची फुंकर घातली.  कोलंबियाच्या  यारी मिनाने अगदी शेवटच्या मिनिटाला गोल करून निर्धारीत वेळेत इंग्लंडला 1-1 असे बरोबरीत रोखले. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीतील ती बरोबरीची कोंडी अतिरिक्त 30 मिनिटांच्या खेळातही न सुटल्याने पेनल्टी शूटआऊटचा खेळवण्यात आली. अन् इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांना 26 जून 1996चा तो दिवस आठवला. युरो चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील लढतीत जर्मनीविरूद्धचा सामना 1-1 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्येही 5-5 अशी बरोबरीत सुटली. त्यामुळे सडन डेथमध्ये प्रत्येक गोल महत्वाचा बनला. जर्मनीच्या आंद्रेस मोलरने गोल केला आणि इंग्लंडकडून 26 वर्षीय साऊथगेट पुढे आला. मात्र त्या संधीवर गोल करण्यात अपयशी ठरल्याने इंग्लंडचे आव्हान संपुष्टाल आले. तो प्रसंग आता प्रशिक्षक असलेल्या साऊथगेट यांना मंगळवारच्या पेनल्टी शूटआऊटमध्ये आठवत होता. 1996ला ज्य़ा मनस्थितीतून साऊथगेट यांना जावे लागले होते, आज त्यांच्या जागी कोलंबियाचा मॅटेअस युरीबे होता. निर्णायक पेनल्टीवर त्याला अपयश आले होते आणि तो ढसाढसा रडायला लागला. साऊथगेट यांना त्याच्या वेदना कळल्या आणि ते त्वरीत युरीबेकडे गेले. रडणा-या युरीबेला त्यांनी मिठी मारली आणि त्याला दु:खातून सावरण्यास सांगितले. बहुतेक 96ला इंग्लंडच्या प्रशिक्षक टेरी व्हेनाब्लेस यांनी दिलेला सल्लाच साऊथगेट यांनी युरीबेला दिला असेल. पण, त्यांच्या या कृत्याने फुटबॉलप्रेमींची मनं मात्र जिंकली. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Englandइंग्लंडColombiaकोलंबियाFootballफुटबॉलSportsक्रीडा