शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : 'गोल'रक्षकाची कमाल, क्रोएशियाची धमाल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 02:26 IST

क्रोएशियाचा गोलरक्षक डॅनिजेल सुबासिच हा या विजयाचा हिरो ठरला.

निझनी नोवगोरोड - विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात आक्रमणाचे अस्त्र घेऊनच मैदानावर उतरलेल्या डेन्मार्क आणि क्रोएशिया यांचा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. डेन्मार्कने 120 मिनिटांच्या खेळात 1-1 अशी बरोबरी मिळवून मानसिकरित्या ही लढत जिंकली होती. शूटआऊटमध्ये दोन्ही संघाचा पहिला प्रयत्न गोलरक्षकांना अडवण्यात यश आले. क्रोएशियाने 3-2 (1-1) असा विजय मिळवला. या विजयात गोलरक्षक डॅनिजेल सुबासिच हिरो ठरला.

या संघांनी पहिल्या चार मिनिटांत गोल धडाका लावला. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला डेन्मार्कच्या मॅथीयास जॉर्गेनसेन याने गोल केला. विश्वचषक स्पर्धा इतिहासात हा दुसरा जलद गोल ठरला. डेन्मार्कच्या या गोलला क्रोएशियाकडून चौथ्या मिनिटाला प्रत्युत्तर मिळाले. मारियो मँड्झुकीचने गोल करून क्रोएशियाला बरोबरी मिळवून दिली. मध्यंतरानंतर डेन्मार्कच्या खेळाडूने उल्लेखनीय खेळ करताना क्रोएशियाचे जबरदस्त आक्रमण अचूकपणे थोपवले. क्रोएशियाचे 6 ऑनटार्गेट प्रयत्न डेन्मार्कच्या गोलरक्षकाने अपयशी ठरवले. अर्जेंटिनाविरूद्ध चमकलेले क्रोएशियाचे ल्युका मॉड्रीच आणि इव्हान रॅकिटीच यांना जखडून ठेवण्यात डेन्मार्कने यश मिळवले. स्पर्धेत एकाच दिवशी दोन सामने 30 मिनिटांच्या अतिरिक्त खेळले गेल्याची ही पहिलीच वेळ असेल. हे दोन्ही संघ 1998च्या विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीचा अडथळा पार करण्यात यश मिळवले होते. मात्र 115 व्या मिनिटाला मॉड्रीचच्या पासवर रेबिचने डेन्मार्कच्या गोलरक्षकाला चकवून आगेकूच केली. तेव्हा जॉर्गनसेनने रेबिचला पाडले आणि पंचांनी थेट पेनल्टी स्पॉट किकचा इशारा दिला. पण, मॉड्रीचचा तो प्रयत्न डेन्मार्कच्या कॅस्पर श्मायकरने अडवला आणि क्रोएशियाने हातात आलेले उपांत्यपूर्व तिकिट गमावले. 1-1 अशा बरोबरीमुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Croatiaक्रोएशियाDenmarkडेन्मार्कFootballफुटबॉलSportsक्रीडा