शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Fifa Football World Cup 2018 : जर्मनी, ब्राझिल संघांनी आणली  ‘जान’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 08:00 IST

अडखळत सुरुवातीनंतर जर्मनी आणि ब्राझिल हे दिग्गज संघ विजयीपथावर परतल्याने त्यांच्या चाहत्यांनी नि:श्वास टाकला आहे.

ठळक मुद्दे स्वीडनविरुद्ध विजयाला गवसणी घातल्याने जर्मन गोटातील चिंतेचे सावट आता दूर झाले आहे. दुसरीकडे नेमार, तसेच आघाडी फळीला सूर गवसल्याने ब्राझिलनेही स्पर्धेत मुसंडी मारण्याची नव्याने सज्जता केली आहे.

सचिन खुटवळकर- अडखळत सुरुवातीनंतर जर्मनी आणि ब्राझिल हे दिग्गज संघ विजयीपथावर परतल्याने त्यांच्या चाहत्यांनी नि:श्वास टाकला आहे. मेक्सिकोविरुद्ध पहिला सामना गमविल्यानंतर जर्मनीवर पहिल्या गटातच गाशा गुंडाळावा लागण्याची टांगती तलवार होती. मात्र, स्वीडनविरुद्ध विजयाला गवसणी घातल्याने जर्मन गोटातील चिंतेचे सावट आता दूर झाले आहे. दुसरीकडे नेमार, तसेच आघाडी फळीला सूर गवसल्याने ब्राझिलनेही स्पर्धेत मुसंडी मारण्याची नव्याने सज्जता केली आहे.

ज्योकिम लू यांच्या मार्गदर्शनाखाली गत विश्वचषकात विजयी कामगिरी करणारा जर्मनी या वेळी मात्र गलितगात्र झाल्यासारखा खेळत होता. आघाडी फळीचे अपयश ही मोठी चिंता जर्मन पाठीराख्यांना सतावत होती. ओझिल, म्युलर आदी धुरंधरांचे अपयश टीकेचे कारण बनले होते. मात्र, मेक्सिकोविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर खडबडून जागे झालेले जर्मन स्वीडनविरुद्ध तुटून पडले आणि त्यांनी गतविजेत्यांना साजेशा खेळाचे प्रदर्शन केले. आता कोरियाविरुद्ध विजय मिळवून बाद फेरीतील स्थान निश्चित करण्याचा चंग जर्मनीने बांधला आहे. 

भारतीयांचा ‘फेव्हरेट’ संघ असलेला ब्राझिल नेहमीच्या जोशात नसल्याने स्पर्धेत विशेष रंगत येत नव्हती. पहिली लढत बरोबरीत सुटल्याने कोस्टारिकाविरुद्ध विजय मिळविण्याच्या जिद्दीने ब्राझिल मैदानात उतरला;  परंतु कोस्टारिकाने कोंडी केली.  नेयमार, कुतिन्हो या प्रमुख खेळाडूंना पिवळे कार्ड मिळाले. यावरून ब्राझिलने किती धसमुसळा खेळ केला असावा, याचा अंदाज येतो. अर्थात कोस्टारिकाचा प्रतिकार मोडून काढत ब्राझिलने इंज्युरी टाइममध्ये २-० असा विजय मिळविला व आपल्या वेगवान खेळाची चुणूक दाखविली. आता सर्बियाला नमवून बाद फेरीत हल्लाबोल करण्यासाठी ब्राझिल सज्ज झाला आहे.

नवख्या व तुलनेने कमी ताकदीच्या संघांनी अनपेक्षितपणे दिग्गज संघांच्या तोंडचे पाणी पळविल्याने त्यांचे चाहतेही निराश झाले होते. मात्र, स्पेन पाठोपाठ जर्मनी व ब्राझिलला विजयाचा सूर गवसल्याने रंगत आली आहे. अंतिम चार संघांत स्थान मिळविण्यासाठी आता जोरदार रस्सीखेच होईल.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८NeymarनेमारBrazilब्राझीलGermanyजर्मनी