शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

FIFA FOOTBALL World Cup 2018: लढवय्ये आणि चिकाटीचे क्रोएट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 17:49 IST

सध्या संघाचा कर्णधार असलेला लुका मॉड्रिक हा त्यावेळी फक्त ६ ते १० वर्षांचा होता. सर्बियन बंडखोरांनी क्रोएट्स नागरिकांवर हल्ले केले त्यावेळी मॉड्रिकच्या डोळ्यादेखत त्याचे आजोबा व अन्य सहा नातेवाईकांना फासावर लटकविण्यात आले होते. अशा मानसिकतेत वाढलेला हाच मॉड्रिक आज अर्जेंटीनाला पाणी पाजणाºया फुटबॉल संघाचा लोकप्रिय कर्णधार झाला आहे.

ठळक मुद्देरक्तातच असलेली लढवय्यी वृत्ती व चिकाटी हे त्यांच्या विजयातील मुख्य घटक असून त्याचे मूळ क्रोएशियाच्या जडणघडणीत आहे.

चिन्मय काळे : क्रोएशियाच्या संघाने गुरुवारी विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर घडवत माजी उपविजेत्याना जवळपास स्पर्धेच्या बाहेर फेकले. अर्जेन्टिनावर 3-0 ने मिळवलेला विजय साऱ्या फुटबॉल जगतासाठी चर्चेचा विषय ठरला. मूळ रक्तातच असलेली लढवय्यी वृत्ती व चिकाटी हे त्यांच्या विजयातील मुख्य घटक असून त्याचे मूळ या देशाच्या जडणघडणीत आहे.

क्रोएशिया हा मूळ फुटबॉल वेड्या युगोस्लाव्हिआचा भाग. युगोस्लाव वंशातील अनेकांनी दुसºया महायुद्धात प्राणाची आहुती दिली. अंगी सैनिकी गुण व त्यामुळेच शरीराला श्रम घडविणाºया फुटबॉलचे या देशात वेड होते. युगोस्लाव्हियाची विश्वचषकातील कामगिरी आजवर तशी फार खराब राहिलेली नाही. १९६२ च्या स्पर्धेत संघाने पश्चिम जर्मनीला नमवत उपांत्य फेरी गाठली होती. याच युगोस्लाव मधून बाहेर पडलेला देश म्हणजे क्रोएशिया.

युगोस्लाव्हियात १९९० च्या सुमारास अंतर्गत युद्ध सुरू झाले. सर्बियन बंडखोरांनी क्रोएट्स बहुल भागावर युद्ध थोपले. त्यामुळे अखेर १९९५ मध्ये क्रोएशिया स्वतंत्र देश म्हणून अस्तित्त्वात आला. विशेष म्हणजे त्यानंतर फक्त तीन वर्षात या देशाच्या संघाने स्वत:ला १९९८ च्या विश्वचषकात पात्र केले. दमदार खेळ करत उपात्यपूर्वी लढतीत बलाढ्य जर्मनीचा ३-० ने पाडाव केला. १९९८ चा विश्वचषक ही क्रोएशियाची पहिलीच स्पर्धा असतानाही त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. तसे इतिहासात फक्त दुसऱ्यांदा घडले होते.१९९८ हा क्रोएशियन फुटबॉलचा सुवर्ण काळ होता. पण मूळ त्या संघातील अनेक खेळाडूंनी १९९९ नंतर सेवानिवृत्ती घेतली. यामुळे २००२ चा विश्वचषकात क्रोएशिया युवा खेळाडूंना घेऊन उतरला होता. तरीहीसुद्धा संघाने त्या स्पर्धेत बलाढ्य इटलीचा पराभव केला होता. पण त्यानंतर २००३ ते २०१५ पर्यंतचा काळ हा क्रोएशियन संघासाठी वादाचा होता. या वादांमुळेच संघाची कामगिरी सुमार होत गेली. पण क्रोएशिया फुटबॉल असोसिएशनने संघाची धुरा लुका मॉड्रिक या शांत स्वभावाच्या पण चिकाटीपूर्ण खेळ करणाºया खेळाडूकडे सोपवली. त्याच्या नेतृत्त्वात संघाने २०१६ च्या युरो चषकात बलाढ्य स्पेनला २-१ ने पाणी पाजले. त्यानंतर आता गतउपविजेत्या अर्जेंटीनाचा ३-० ने पराभव करीत फुटबॉल विश्वाला धक्का दिला.

एकूणच १९९८ ची स्पर्धा असो वा, २००२ किंवा २०१६ चा युरो चषक आणि आता २०१८ ची विश्वचषक स्पर्धा, कुणाच्या ध्यानीमनीही नसताना शांत राहून सर्वोत्तम खेळ करीत मातब्बर व बलाढ्य विश्वचषक दावेदारांना मात करण्यात क्रोएशिया सदैव अग्रेसर राहीला आहे. युगोस्लाव्हीयात असतानाचा अन्याय सहन करीत त्यातून तयार झालेला हा देश आहे. त्यातच त्यांच्या या लढवय्या व चिकाटीपूर्ण वृत्तीचे गमक आहे. 

‘लुका मॉड्रिक’च्या डोळ्यासमोर झाल्या हत्या१९९० ते १९९५ हा काळ क्रोएशियन नागरिकांसाठी प्रचंड ताणतणावाचा होता. सध्या संघाचा कर्णधार असलेला लुका मॉड्रिक हा त्यावेळी फक्त ६ ते १० वर्षांचा होता. सर्बियन बंडखोरांनी क्रोएट्स नागरिकांवर हल्ले केले त्यावेळी मॉड्रिकच्या डोळ्यादेखत त्याचे आजोबा व अन्य सहा नातेवाईकांना फासावर लटकविण्यात आले होते. अशा मानसिकतेत वाढलेला हाच मॉड्रिक आज अर्जेंटीनाला पाणी पाजणाºया फुटबॉल संघाचा लोकप्रिय कर्णधार झाला आहे.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Argentinaअर्जेंटिनाFootballफुटबॉलCroatiaक्रोएशिया