शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018: फ्रान्स वि. डेन्मार्क सामना गोलशून्य बरोबरीत; दोन्ही संघ बाद फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 21:53 IST

आक्रमक खेळ करुनही दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश

मॉस्को: फिफा वर्ल्ड कप 2018 च्या क गटातील फ्रान्स विरुद्ध डेन्मार्क सामना बरोबरीत सुटला आहे. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं असलं तरी दोन्ही संघांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. फ्रान्सनं सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यानं त्यांचा पुढील फेरीतील प्रवेश आधीच निश्चित झाला होता. तर डेन्मार्कनं फ्रान्सला बरोबरीत रोखल्यानं आणि याच गटातील पेरुनं ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानं डेन्मार्कचं पुढील फेरीतील तिकीट नक्की झालं आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि पेरु या दोन्ही संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

लुज्निकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी संथ खेळ केला. त्यामुळे दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं. या सामन्यानंतर फ्रान्सचे क गटात 7 गुण झाले. फ्रान्स गटात अव्वल स्थानी असल्यानं त्यांना बाद फेरीत प्रवेश मिळाला आहे. तर हा सामना बरोबरीत सुटल्यामुळे डेन्मार्कचे 5 गुण झाले आहेत. त्यामुळे डेन्मार्क गटात दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनाही बाद फेरीचं तिकीट मिळालं आहे. अतिशय बलाढ्य समजल्या जाणाऱ्या फ्रान्सविरुद्ध डेन्मार्कनं दमदार खेळ केला. स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या फ्रान्सनं अनेकदा गोल करण्यासाठी आक्रमक प्रयत्न केले. मात्र डेन्मार्कच्या बचावपटूंनी त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. डेन्मार्क या सामन्यात बचावात्मक खेळ केला. त्यामुळे हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. विश्वचषक फुटबॉल सामन्यात पहिल्यांदाच डेन्मार्कनं सामना 0-0 असा बरोबरीत सोडवला आहे. सामन्याच्या पहिल्या सत्रात फ्रान्सनं आक्रमक खेळ केला. त्यामुळे डेन्मार्कचा संघ बॅकफूटवर होता. दुसऱ्या सत्रातही फ्रान्सनं अनेकदा गोलपोस्टवर आक्रमणं केली. मात्र डेन्मार्कच्या खेळाडूंनी त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाही.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Denmarkडेन्मार्कFootballफुटबॉल