शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : सर्बियाविरुद्ध ब्राझीलची १-० अशी आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 00:28 IST

ब्राझील संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सर्बियाविरूध्द पहिल्या सत्रात १-० अशी आघाडी घेतली.

ठळक मुद्दे पॉलिन्होने ३६ व्या मिनिटाला गोल करत ब्राझीलला आघाडी मिळवून दिली.

नोव्हगोरोड : स्पार्टक स्टेडियमवर सुरू असेलल्या ‘ई’ गटातील सामन्यात ३६ व्या मिनिटाला जुझे पावलिन्हो याने शानदार गोल नोंदवला. या गोलच्या बळावर पाच वेळा विश्वचॅम्पियन झालेल्या ब्राझील संघाने सर्बियाविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली होती.

उपउपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशासाठी ब्राझीलला केवळ अनिर्णित निकालाची गरज आहे. असे असताना ब्राझीलने सर्बियाविरुद्ध नेहमीपेक्षा वेगळीच व्यूव्हरचना आखली. सामन्याच्या सुरुवातीपासून ब्राझीलने अतंत्य शांत आणि संयमी खेळ केला. प्रतिस्पर्धी संघालाही त्यांनी संधी मिळू दिल्या नाहीत. उलट ब्राझीलला पहिल्या हाफमध्ये तीन-चार संधी मिळाल्या होत्या. स्टार खेळाडू नेयमार यानेही संधी दवडल्या. सामन्यात १७ व्या मिनिटापर्यंत चेंडू मध्यभागातच होता. ब्राझील जणू पासिंगचा सराव करीत असल्याचे जाणवत होते. ते संधीच्या शोधात होते. २४ व्या मिनिटाला मिळालेली संधीसुद्धा नेयमारने घालवली. जर्सी नंबर ९ या खेळाडूने नेयमारला पास दिला होता. यावर नेयमारने डाव्या पायाने मारलेल्या फटक्यावर चेंडूला गोलरक्षकाने ढकलून दिशाहीन ठरवले. ३५ व्या मिनिटाला कुतिन्होने बचावपटूंना भेदत धावत येत चेंडू पावलिन्होकडे दिला. चेंडू उसळल्याने पावलिन्हो याने गोलरक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला जाळीत ढकललेआणि ब्राझीलने आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी मध्यंतरापर्यंत कायम राखली. 

असा आहे रेकॉर्ड...गेल्या चार विश्वचषकांच्या साखळी सामन्यांत ब्राझीलने एकही सामना गमावला नाही. हा त्यांचा विक्रमच आहे. त्यांनी विश्वचषकाच्या साखळीत आतापर्यंत ३८ सामने खेळले आहेत. त्यांनी २९ सामने जिंकले आणि आठ ड्रॉ केले. सर्बियाविरुद्धदेखील त्यांना विजय किंवा ड्रॉची गरज होती. ब्राझीलचा स्वित्झर्लंडविरुद्ध पहिला सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. दुसºया सामन्यात त्यांनी कोस्टारिकाला २-० ने पराभूत केले होते. या दोघांतील गेल्या चार सामन्यांत ब्राझीलने एक सामना जिंकला आहे. तर तीन बरोबरीवर आटोपले. ब्राझीलने सर्बियाविरुद्ध ४ तर सबिर्याने ब्राझीलविरुद्ध २ गोल नोंदवले होते.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Brazilब्राझीलFootballफुटबॉल