शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

FIFA Football World Cup 2018 : ... अन् त्यांनी कटू इतिहासाला लगावली स्पॉट किक!!! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 15:59 IST

कोलंबियाविरूद्धच्या बाद फेरीतील लढतीने इंग्लंड संघाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.

ठळक मुद्दे... पण तरीही ते युवा शिलेदार मंगळ्वारी उपांत्यपूर्व फेरीत धडकले... आता जेतेपदाच्या दावेदारामध्ये त्यांची गणना होऊ लागली आहे.

स्वदेश घाणेकर : रशियात फुटबॉल विश्वचषकासाठी इंग्लंडचे खेळाडू दाखल झाले त्यावेळी त्यांच्याकडून फार अपेक्षा केल्या जात नव्हत्या... इतिहासाच्या अपयशाचा पाढा इथेही गिरवतील आणि मायदेशी परततील, अशी चर्चा रंगलेलीच... त्यामुळे जेतेपदाचा दावेदार सोडा बाद फेरीचा अडथळा ओलांडला तरी पुरे, अशी सर्वांची भावना... त्यांच्या संघाचे सरासरी वय २६-२७ वर्षे... संघातील बऱ्याच खेळाडूंना महत्वाच्या स्पर्धेचे दडपण काय असते याची जाण नाही... पण तरीही ते युवा शिलेदार मंगळ्वारी उपांत्यपूर्व फेरीत धडकले... आता जेतेपदाच्या दावेदारामध्ये त्यांची गणना होऊ लागली आहे.

कोलंबियाविरूध्दच्या बाद फेरीतील लढतीने इंग्लंड संघाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. क्लबमधील वैमनस्य राष्ट्रीय संघाकडून खेळताना विसरायचे असते अशी साधी शिस्त या संघाला कधी नव्हती. याची कबूली खुद्द सध्याचा कर्णधार हॅरी केनेने विश्वचषक स्पर्धेत दाखल होण्यापूर्वी दिली होती. यापूर्वी जे घडले ते मागे सोडून आम्ही एकसंध स्पर्धेत जेतेपदासाठी प्रयत्न करू. क्लबमधीव वैमनस्य राष्ट्रीय संघात आणण्याची चुक यापुढे होणार नाही, असे केन म्हणाला होता. 

त्याची प्रचिती घडवताना संघातील प्रत्येक खेळाडू एकजुटीने खेळली. अगदी पहिल्या सामन्यापासून.. त्यामुळे इतिहासाच्या अपयशावर स्वार होऊन नवा गोड इतिहास लिहिण्यासाठी ही फळी तयार असल्याचे स्पष्ट झाले. त्यावर मगळवारी झालेल्या लढतीत आणखी एक मोहोर उमटली. पेनल्टी शूटआऊट आणि इंग्लंड याचे कधीच पटले नाही. त्यामुळे कोलंबिया विरूध्दचा सामना अगदी अखेरच्या क्षणातील चुकांमुळे पेनल्टी शूटआऊट मध्ये गेला तेव्हा इंग्लंडचा पराभव पक्का मानला जात होता. 

१९९६ च्या युरोपियन चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी पेनल्टी शूटआऊटवर स्पेनला नमवले होते. तेच काय त्यांचे यश. विश्वचषक आणि युरोपियन चषक अशा महत्वांच्या स्पर्धांत त्यांना मिळून सहावेळा पेनल्टी शूटआऊटवर पराभव पत्करावे लागले आणि त्यापैकी तीन हे विश्वचषक स्पर्धेतील होते. त्यामुळे कोलंबियाविरूध्दही इतिहासाची पुनरावृत्ती होईल अशी भिती व्यक्त करण्यात येत होती. पण या युवा संघांने इतिहासाला झुकवण्याची ताकद असल्याचे  दाखवून दिले. 

तिसऱ्या प्रयत्नात जॉर्डन हेंडरसनची पेनल्टी किक कोलंबियाच्या गोलरक्षकाने अडवल्या नंतर इंग्लंडचाहत्यांसमोर त्या कटू आठवणेव उभ्या राहिल्या.. त्यासोबत भितीही आली. पण या खेळाडून्चा आत्मविश्वास भलताच उंचावलेला होता. त्यांना नशीबाचीजी साथ मिळाली. कोलंबियाच्या मॅटीउस उरीबने स्पॉट किक गमावली आणि त्यांच्या पुढील प्रयत्नात इंग्लंडचा गोलरक्षकपिकफोर्डेने सुरेख पध्दतीने बचाव केला. डायरने मारलेली स्पॉट किक इंग्लंडच्या विजयाची आणि कटू इतिहासाला लगावलेली किक ठरली. विश्वचषक स्पर्धेत प्रथमच त्यांना पेनल्टी शूटआउटवर विजय मिळवता आला. आता हा उंचावलेला आत्मविश्वास त्यांना कुठपर्यंत घेऊन जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यांचा ' नो वन टू स्पेशल वन' प्रवास सुरु झाला आहे. 

इतिहास काय सांगतोइंग्लंडला युरोपियन आणि विश्वचषक स्पर्धेतील आठ पेनल्टी शूटआऊट लढतींत केवळ दोनच विजय मिळवता आले आहेत. - ४ जुलै : पराभूत वि. वेस्ट जर्मनी  १-१ ( ३-४) - २२ जून १९९६ :  वि. वि. स्पेन ०-० ( ४-२) - २६ जून १९९६ : पराभूत वि. जर्मनी १-१ (५-६) - ३० जून १९९८ : पराभूत वि. अर्जेंटिना २-२ (३-४) - २४ जून २००४ : पराभूत वि. पोर्तुगाल २-२ (५-६) - १ जुलै २००६ : पराभूत वि. पोर्तुगाल ०-० (१-३) - २४ जून २०१२ : पराभूत वि. इटली ०-० ( २-४) - ३ जुलै २०१८ : वि. वि. कोलंबिया १-१ (४-३) 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Englandइंग्लंडFootballफुटबॉलColombiaकोलंबिया