शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Fact Check: क्विन एलिझाबेथ आहेत ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या जबरदस्त फॅन; मँचेस्टर युनायटेड क्लबकडे केली 'ही' खास मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 17:53 IST

१२ वर्षांनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळणार आहे. पोर्तुगालच्या सुपरस्टार फुटबॉलपटूनं इटालियन क्लब युव्हेंटससोबतचा करार संपुष्टात आणला अन् स्वगृही परतला.

१२ वर्षांनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळणार आहे. पोर्तुगालच्या सुपरस्टार फुटबॉलपटूनं इटालियन क्लब युव्हेंटससोबतचा करार संपुष्टात आणला अन् स्वगृही परतला. ३६ वर्षीय रोनाल्डोनं २००३ ते २००९ या कालावधीत मँचेस्टर युनायटेडसाठी २९२ सामन्यांत ११८ गोल्स केले आहेत. सर अॅलेक्स फर्ग्युसन यांच्यामुळे जगाला रोनाल्डो हा अव्वल दर्जाचा खेळाडू मिळाला. फर्ग्युसन यांनी २००९मध्ये रोनाल्डोला इंग्लिश प्रीमिअर लीग ( EPL) हे मोठे व्यासपीठ दिले आणि त्यानंतर रोनाल्डोनं मागे वळून पाहिलेच नाही. त्यामुळे रोनाल्डोचा हा निर्णय त्याच्या फॅन्सला प्रचंड आनंद देणारा आहे. क्विन एलिझाबेथ II ( Queen Elizabeth II ) याही रोनाल्डोच्या जबरदस्त फॅन असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

जगात भारी, विराट कोहली!; कॅप्टन कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम!

रोनाल्डोनं मँचेस्टर युनायटेडसाठी पुन्हा खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्विन एलिझावेथ II यांनी मँचेस्टर युनायटेड क्लबकडून रोनाल्डोचं नाव असलेल्या ८० जर्सी मागवल्याचे वृत्त इंग्लिश मीडियात प्रसिद्ध झाले आहे. क्विन एलिझावेथ II यांना त्यांच्या स्टाफसाठी त्या जर्सी हव्या आहेत. क्विन एलिझावेथ II त्यांनी स्वतःसाठी रोनाल्डोची स्वाक्षरी असलेली जर्सी मागवल्याचाही दावा करण्यात आला आहे. पण हे खरं आहे का?  

ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडसोबत खेळणार असल्याचे १ सप्टेंबरला जाहीर करण्यात आले, त्यानंतर या अफवा सुरू झाल्या. क्विन एलिझावेथ II यांनी रोनाल्डोची स्वाक्षरी असलेली जर्सी मागितल्याची चर्चेनं जोर धरला. Sport Innovation Society या ट्विटर हँडलवर ही बातमी प्रसिद्ध झाली अन् चर्चा अधिक वाढल्या.  

पण, अशी कोणतीच मागणी महाराणींनी केली नाही. Sport Innovation Society नं ते ट्विट डिलिट केलं अन् आम्ही बातमीची शाहनिशा केली नसल्याचं त्यांन स्पष्ट करून माफी मागितली.   रोनाल्डोनं २०१८ साली ला लिगा क्लब रेयाल माद्रिदसोबतचा ९ वर्षांचा प्रवास संपवून युव्हेंटसच्या ताफ्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यानं तीन वर्षांत इटालियन क्लबकडून १३४ सामन्यांत १०१ गोल्स केले. रेयाल माद्रिदकडून खेळताना रोनाल्डोनं चार चॅम्पियन्स लीग जेतेपदं आणि दोन ला लिगा ट्रॉफी जिंकल्या. त्याच्या नावावर ३० मोठ्या स्पर्धांची जेतेपदं आहेत. त्यात पाच चॅम्पियन्स लीग, चार फिफा क्लब वर्ल्ड कप, सात इपीएल, स्पेन व इटली येथील जेतेपदं आणि पोर्तुगालकडून एक युरो चषक यांचा समावेश आहे.  

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोEnglandइंग्लंड