शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

विश्वचषकावर युरोपची सत्ता कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 02:17 IST

ब्राझील आणि उरुग्वे यांच्या पतनामुळे युरोपियन संघ आता मोकळेपणाने श्वास घेतील. आता विश्वचषकावर त्यांचाच नाही तर कोणाचा अधिकार? १९५८ चा अपवाद सोडला तर लॅटिन अमेरिकेला युरोपमध्ये कधीच झेंडा रोवता आलेला नाही.

-  रणजीत दळवीब्राझील आणि उरुग्वे यांच्या पतनामुळे युरोपियन संघ आता मोकळेपणाने श्वास घेतील. आता विश्वचषकावर त्यांचाच नाही तर कोणाचा अधिकार? १९५८ चा अपवाद सोडला तर लॅटिन अमेरिकेला युरोपमध्ये कधीच झेंडा रोवता आलेला नाही. रणमैदान सोडेपर्यंत ब्राझीलने संघर्ष केला. मात्र उरुग्वेने आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या विजयाला हातभार लावला. त्यांच्या अनुभवी गोलरक्षक फर्नांडो मुसलेराचा अंदाज साफ चुकला आणि तीन विश्वचषक आणि एकूण शंभर आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या या गोलरक्षकाच्या कारकिर्दीवर एक डाग लागला. मात्र त्याचा प्रतिस्पर्धी फ्रान्सचा कर्णधार ह्यूगो लॉरीस आपल्या संघाचा तारणहार ठरला. त्याने मार्टिन कॅसेरासचा हेडर उजवीकडे झेपावत जर रोखला नसता तर मध्यांतराच्या ठोक्याला बरोबरी झाली असती. आणि न जाणो लढतीचे चित्र बदलले असते.फ्रान्सला आघाडी मिळाली आश्चर्यकारकरित्या ग्रीझमनची पेनल्टी क्षेत्राच्या डाव्या बाजूने घेतलेल्या फ्री किकवर राफाएल व्हराने एखाद्या बाणाप्रमाणे झेपावला आणि अप्रतिम गोल करण्यात यशस्वी झाला. फ्रान्सच्या पेनल्टी क्षेत्राच्या आसपास फ्री किक देणे किती धोक्याचे आहे हे आणखी एकदा सिद्ध झाले. कायलियन एमबाप्पे मात्र आज शांत होता. त्याला उरुग्वेच्या बचावफळीने वावच दिला नाही. त्याने एकदा नेमारसारखे नाटक केले. त्यामुळे राडा होण्याची शक्यता निर्माण झाली. पण बलदंड शरीरयष्टीचे अर्जेंटिन रेफ्री नेस्टर पिटाना यांनी वेळीच गर्दीत उडी घेत नियंत्रण मिळवले. स्वत: एक कसलेले नट असणाऱ्या पिटाना यांनी सुरुवातीलाच सुआरेजला ताकीद दिली होती. कुर्तोआ हा बेल्जिअमच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला. ब्राझीलचे डझनभर धोकादायक गोल प्रयत्न त्याने बचावफळीतील सहकाºयांच्या साथीने विफल ठरवले.त्याने स्टॉपेज टाईममध्ये नेयमारचा गोल करण्याचा प्रयत्न कुचकामी ठरवला. त्याचे काय वर्णन करावे?, वर्ल्ड क्लास ! ज्या दिवशी गोलरक्षक आपली उपयुक्तता सिद्ध करत होते. त्या दिवशी मुसलेरावर मोठी आपत्ती ओढावली. त्याचे अतिशय वाईट वाटले. ग्रीझमनचा तो फटका विलक्षण होता. चेंडूवर जबरदस्त आघात, त्याच्यावर प्रचंड फिरकी आणि ऐन वेळी दिशा बदलण्यासह चेंडू डिप झाला त्यामुळे मुसलेराकडे वेळच राहिला नाही. त्याने शेवटच्या क्षणी तो दूर लोटण्याचा विफल प्रयत्न केला. पण घात झाला. चेंडू उडून त्याच्या डोक्यावरून गोलमध्ये गेला. मुसलेरा काय बरेच गोलरक्षक अनेकवेळा विजय मिळवून देणारे हिरो असतात. मात्र असा एखादा अपघात त्यांच्यावर खलनायकाचा शिक्का मारून जातो.ब्राझीललाही सुरुवातीलाच अपघाताला सामोरे जावे लागले. नासेर चॅडलीची कॉर्नर किक धोकादायक नव्हता. पण गॅब्रिएल जीझस आणि फर्नांडिन्हो यांच्यात तू का मी असा गोंधळ उडाला आणि चेंडू फर्नांडिन्होच्या उजव्या हाताला लागून गोलमध्ये गेला. या ओन गोलमध्य डे ब्रुईन याने भर टाकली. ब्राझीलला कॉर्नर मिळाला तो विफल ठरला आणि बेल्जिअमने लुकाकुद्वारे जबरदस्त प्रतिहल्ला केला. साधारणपणे ३५-४० यार्ड मुसंडी त्याने मारली. त्याला कोणीच रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचा डे ब्रुईनला पासही अचूक निघाला. आसपास कोणीही नाही. हे दिसताच त्याने तोफगोळा डागला. आॅलिसन फक्त पाहत राहिला. त्याने सामन्यात दोन तीन वेळा संघाला वाचवले. पण त्याने येते हात टेकले. एवढे असूनही ब्राझिलने हार मानली नाही. मार्सेलो, फिलीप कुटिन्हियो, नेयमार यांनी एकामागून एक हल्ले केले. पण बेल्जिअमचा किल्ला पडला नाही. त्यांचे बचावपटू शरीर चक्क झोकून देत ते हल्ले विफल करत होते. आणि ते चुकलेच तर कुर्तोआ होताच मागे. त्याने ३७ व्या मिनिटाला डावीकडे जबरदस्त सूर मारून कुटिन्हियोला गोलपासून वंचित ठेवले. उरुग्वेप्रमाणे ब्राझिललाही अपयशाचा सामना करावा लागला. तो गोल झाला असता तर चित्र बदलू शकले असते. मध्यांतरानंतर विलियन आणि झीजस यांची जागा रॉबर्टो फर्मिनो आणि डग्लस कॉस्टा यांनी घेतली. त्यामुळे हल्ल्यांना अधिक धार आली. त्यांची तीव्रता वाढली. पण रेनॅटो आॅगस्टोला एवढ्या उशिरा का उतरवले. त्याने केला हेडरवरील गोल तसा उशिराच झाला. जसजसा अंतकाळ जवळ आला तशी ब्राझीलने घाई केली. फटकेबाजी स्वैर झाली. इतकी की त्याची लागण कुटिन्हियोलाही झाली. ब्राझीलने दोन वेळा पेनल्टी अपील केले. पण ग्रॅब्रिएल झीजसला व्हिन्सेट कोम्पनी केलेल्या टॅकलवर रेफ्री मिलोरॅड मॉझिक आणि व्हीएआर पेनल्टीच्या निर्णयाप्रत येऊ शकले नाही. 

टॅग्स :FootballफुटबॉलFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८