शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Euro 2020 semifinal : स्पेनसाठी 'नायक'च ठरला खलनायक; पेनल्टी शूटआऊटच्या थरारात इटलीचा दणदणीत विजय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 11:17 IST

Euro 2020 semifinal :  स्पेनकडून २०१२च्या यूरो स्पर्धेतील फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा इटलीनं बुधवारी काढला.

Euro 2020 semifinal :  स्पेनकडून २०१२च्या यूरो स्पर्धेतील फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा इटलीनं बुधवारी काढला. विम्बली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इटलीनं पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन वेळच्या विजेत्या स्पेनचा ४-२( १-१) असा पराभव केला.  पहिल्या सत्रात स्पेननं वर्चस्व गाजवताना सर्वाधिक काळ चेंडूवर ताबा ठेवला होता, परंतु त्यांना गोल करण्यात अपयश आलं. इटलीचा बचाव कमकुवत जाणवत होता. मात्र त्याचा फायदा उचलण्यात स्पेनला अपयश आलं. 

दुसऱ्या सत्रात फेडेरीको चिएसानं गोल करताना इटलीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्पेनचा बरोबरीसाठी संघर्ष सुरू झाला. निर्धारित वेळ संपण्यासाठी १० मिनिटांचा कालावधि शिल्लक असताना स्पेननं स्टार खेळाडू अलव्हारो मोराटाला मैदानावर उतरवले अन् त्यानं बरोबरीचा गोल करून सामन्यातील चुरस वाढवली. अतिरिक्त वेळेतही हिच बरोबरी कायम राहिल्यानं सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. स्पेननं उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वित्झर्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्येच विजय मिळवला होता.

२००८च्या यूरो स्पर्धेत स्पेननं इटलीला पेनल्टी शूटआऊटमध्ये  पराभूत केलं होतं, परंतु यावेळी दानी ओल्मो व मोराटा यांना गोल करण्यात अपयश आलं, तर मॅन्यूएल लोकाटेल्लीनं इटलीसाठीची पहिलीच फ्री किक चुकवली. गोलरक्षक जी डोनारुम्मानंही त्याची कामगिरी चोख बजावली. स्पेनला बरोबरी मिळवून देणारा मोराटोच पेनल्टी शूटआऊटमधील चुकलेल्या फ्री किकमुळे खलनायक ठरला. १९६८नंतर इटलीला युरो चषक जिंकण्याची संधी आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंड आणि डेन्मार्क हे भिडणार आहेत.

टॅग्स :ItalyइटलीFootballफुटबॉल