शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Euro 2020: पॉल पोग्बाचे रोनाल्डोच्या पावलावर पाऊल, समोरून हटवली Heineken ची बॉटल; जाणून घ्या त्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 15:16 IST

Euro 2020: ख्रिस्तियानो रोनाल्डोनं Euro 2020च्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत समोरील कोका कोलाच्या दोन बॉटल्स बाजूला केल्या अन् कंपनीला 4 अब्ज डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला.

Euro 2020: ख्रिस्तियानो रोनाल्डोनं Euro 2020च्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत समोरील कोका कोलाच्या दोन बॉटल्स बाजूला केल्या अन् कंपनीला 4 अब्ज डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला. रोनाल्डोची ही कृती ताजी असताना फ्रान्सचा स्टार मध्यरक्षक पॉल पोग्बा यानं ( France star midfielder Paul Pogba) रोनाल्डोच्या पावलावर पाऊल ठेवताना पत्रकार परिषदेत समोर असलेली हेनिकेन बिअरची बॉटल उचलून खाली ठेवली. इस्लाम धर्मात मद्य सेवनाला परवानगी नाही आणि पोग्बा हा इस्लाम धर्माचे पालन करतो. त्यामुळे त्यानं ही कृती केली.  

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'त्या' कृतीमुळे शेअर बाजार गडगडला, Coca Colaला ४ अब्ज डॉलर्सचा फटका बसला!

मद्याचे कोणत्याची प्रकारच्या प्रमोशनास विरोध करणारा पोग्बा हा पहिला मुस्लिम खेळाडू नाही. इंग्लंडचे क्रिकेटपटू मोईन अली याचाही या गोष्टीला विरोध आहे. त्यामुळेच इंग्लंडनं 2019ची वर्ल्ड कप ट्रॉफी सेलिब्रेशनच्या वेळी मोईन अलीनं शॅम्पेन उडवत असताना माघार घेतली होती. तसेच अली त्याच्या जर्सीवर मद्याची जाहीरात करत नाही. फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातल्या सामन्यात स्वयंगोलमुळे जर्मनीला हार मानावी लागली. मॅट हुम्मेल्स याच्याकडून 20व्या मिनिटाला झालेल्या स्वयंगोलनं फ्रान्सला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली अन् त्यानंतर जर्मनीला बरोबरीचा गोल करता आला नाही.

पोर्तुगाल संघाचा कर्णधार अन् जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो Euro 2020 स्पर्धेतील पहिल्या लढतीपूर्वीच चर्चेत आला होता. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी कॉन्फरन्स रूममध्ये दाखल होताच टेबलवरील कोका कोलाच्या बॉटल पाहून रोनाल्डो थोडाला नाराज दिसला.  रोनाल्डोनं Coca Cola च्या दोन बॉटल्स हलवल्या अन् दुसरीकडे शेअर बाजारही गडगडला. रोनाल्डोच्या त्या कृतीनं Coca Colaचे स्टॉक्स 1.6% टक्क्यांनी कोसळून ते 242 बिलियन अमेरिकन डॉलरवरून 238 बिलियन अमेरिकन डॉलरवर आले. कोका कोला कंपनीला 4 बिलियन अमेरिकन डॉलरचा फटका बसला... भारतीय रक्कमेत सांगायचे तर हे नुकसान 2,93,27,80,00,000 इतके मोठे आहे. 

टॅग्स :Franceफ्रान्सGermanyजर्मनी