शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

फिफा अंडर 17 वर्ल्डकपवर इंग्लंडने पहिल्यांदाच कोरलं नाव, स्पेनचा उडवला धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 10:09 PM

अंतिम लढतीत इंग्लंडने पिछाडीवर पडल्यानंतरही उत्तम खेळ करत विश्वचषकावर नाव कोरलं. इंग्लंडने स्पेनची २-० अशी आघाडी मोडून काढत ५-२ अशा गोलफरकाने ही लढत जिंकली...

कोलकाता - फिफा अंडर 17 विश्वचषकावर इंग्लंडने पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं आहे. कोलकाता येथे झालेल्या अंतिम लढतीत इंग्लंडने पिछाडीवर पडल्यानंतरही उत्तम खेळ करत विश्वचषकावर नाव कोरलं. इंग्लंडने स्पेनची २-० अशी आघाडी मोडून काढत ५-२ अशा गोलफरकाने ही लढत जिंकली, तर स्पेनला चौथ्यांदा अंतिम फेरी गाठल्यानंतरही पुन्हा एकदा ट्रॉफीशिवाय मायदेशी परतावे लागणार आहे.

प्रथमच फायनलमध्ये खेळणा-या इंग्लंडकडून फोडेनने ६९ आणि ८८ व्या मिनिटाला असे दोन गोल केले तर रेयान ब्रेवस्टरने ४४ व्या, मॉर्गन गिब्स व्हाईटने ५८ व्या आणि मार्क ग्युही याने ८४ व्या मिनिटाला प्रत्येकी १ गोल केला. स्पर्धेत दोन वेळेस गोलची हॅट्ट्रिक साधणा-या ब्रेवस्टरचा हा आठवा गोल होता.स्पेनकडून दोन्ही गोल सर्जियो गोमेजने १0 व्या आणि ३१ व्या मिनिटाला केले.

दोन्ही संघांतील ही लढत युरोपियन चॅम्पियनशीपची पुनरावृत्ती होती आणि त्या सामन्यातील पराभवाचा हिशेबही आज इंग्लंडने विजय मिळवताना चुकता केला. युरोपियन चॅम्पियनशीपचा फायनल निर्धारीत वेळेत २-२ असा बरोबरीत होता आणि त्यानंतर स्पेनने पेनल्टी शूटआऊइमध्ये विजय नोंदवला होता.

स्पेन संघाने याआधी १९९१, २00३ आणि २00७ च्या फायनलमध्ये धडक मारली होती आणि तिन्ही वेळेस त्यांना पराभव पत्करावा लागला होता. संघ चौथ्यांदा अंतिम फेरीतील पराभवाची मालिका खंडित करु शकला नाही. फायनलपर्यंत एकही सामना न गमावणा-या इंग्लंडने या विजयासह २00७ मध्ये या वयोगटात आपले वर्चस्व कायम ठेवले. त्याआधी इंग्लंडच्या अंडर २0 संघाने या वर्षी कोरियात अंडर २0 वर्ल्डकप जिंकला होता. तसेच त्यांचा अंडर १९ संघही युरोपियन चॅम्पियन बनला होता.

 

ब्राझील तिस-या स्थानावर -मालीच्या गोलकीपिंगमधील गंभीर चुका आणि युकी एलबर्टो याने अखेरीस केलेला शानदार गोल या जोरावर ब्राझीलने फिफा १७ वर्षांआतील विश्वचषकात मालीला २-० असे पराभूत केले.मालीचा गोलकिपर युसोफ कोईता याने एलेनला ५५ व्या मिनिटाला गोल ‘भेट’ म्हणून दिला. दुसºया हाफमध्ये एलबर्टो याने ८८ व्या मिनिटाला शानदार गोल केला. मालीने ब्राझीलच्या गोलपोस्टवर अनेक हल्ले केले. मात्र हा सामना रोमांचक झाला नाही. उपांत्य फेरीत ब्राझीलला इंग्लंडने पराभूत केले होते.प्रेक्षकांच्या उपस्थितीचा नवीन विक्रम -भारतात फिफा अंडर १७ वर्ल्डकप स्पर्धा होत आहे आणि ही स्पर्धा इतिहासात सर्वाधिक फुटबॉल चाहत्यांनी पाहण्याचा नवीन विक्रम भारतातील फिफा स्पर्धेदरम्यान रचला गेला आहे. आज येथे ब्राझील आणि माली या दोन संघांत तिसºया स्थानाच्या प्लेआॅफनंतर ही स्पर्धा पाहणाºया प्रेक्षकांची १२३0९७६ ही संख्या ओलांडली आहे. जास्तीत जास्त प्रेक्षक पाहण्याचा विक्रम १९८५ मध्ये चीन येथील फिफा अंडर १७ वर्ल्डकपदरम्यान बनला होता. भारतात सहा स्थळांवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सॉल्ट लेक स्टेडियममध्ये आज ब्राझील विरुद्ध माली हा सामना पाहण्यासाठी ५६४३२ प्रेक्षक उपस्थित होते. त्यामुळे या स्पर्धेची एकूण प्रेक्षकांची संख्या १२८0४५९ पर्यंत पोहोचली आहे. सामन्याआधी हा विक्रम तोडण्यासाठी फक्त ६४९४९ प्रेक्षकांची आवश्यकता होती.मेक्सिकोत २0११ मध्ये झालेल्या स्पर्धेत १00२३१४ प्रेक्षक उपस्थित होते आणि हा १0 लाखांचा आकडा पार करणारी ही तिसरी स्पर्धा आहे.

टॅग्स :Footballफुटबॉल2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017