शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांसाठी दारे उघडतील!, झिंगनच्या यशाने भारतीय फुटबॉलपटूंचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 08:55 IST

sandesh jhingan : क्रोएशियाची सर्वोच्च लीग असलेल्या पर्वा एचएनएलमध्ये खेळणारा झिंगन पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ठरेल.

कोलकाता : भारतीय फुटबॉल संघाचा बचावपटू संदेश झिंगन याला क्रोएशियाच्या एचएनके सिबेनिक या आघाडीच्या डिव्हिजन क्लबने करारबद्ध केल्यानंतर भारतीय खेळाडूंना त्यांचा खेळ आणखी उंचावेल असा विश्वास आहे. तसेच, जेव्हा झिंगन युरोपियन खेळाचा अनुभव घेऊन मायदेशी परतेल, तेव्हा तो वेगळ्या दर्जाचा खेळाडू बनलेला असेल आणि त्याच्यामुळे आता इतर भारतीय खेळाडूंसाठीही नवे दरवाजे उघडतील, असा विश्वासही भारतीय फुटबॉलपटूंनी व्यक्त केला आहे.

क्रोएशियाची सर्वोच्च लीग असलेल्या पर्वा एचएनएलमध्ये खेळणारा झिंगन पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ठरेल. त्याने काही दिवसांपूर्वीच एटीके मोहन बागानला सोडचिठ्ठी देत एचएनके सिबेनिक क्लबमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. यावर आनंद व्यक्त करताना भारताचा मध्यरक्षक अनिरुद्ध थापा याने म्हटले की, ‘संदेश पाजीला खूप खूप धन्यवाद. भारतीय फुटबॉलसाठी हे मोठे यश आहे. खूप शुभेच्छा. आम्हाला माहीत आहे की, जेव्हा संदेश परतेल, तेव्हा तो वेगळ्या दर्जाचा खेळाडू बनलेला असेल.’ राष्ट्रीय संघातील सर्वच खेळाडूंनी झिंगनला शुभेच्छा दिल्या.

युरोपियन व्यावसायिक लीगसाठी करारबद्ध होणारा झिंगन पहिला भारतीय बचावपटू ठरला. मध्यरक्षक ब्रेंडन फर्नांडिस याने आशा व्यक्त केली की, झिंगनमुळे आता भारतीय खेळाडूंसाठी नव्या संधी चालून येतील. ब्रेंडन म्हणाला की, ‘हा क्षण केवळ भारतीय फुटबॉलसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे.  ज्यांना युरोपात खेळण्याची इच्छा आहे, अशा सर्व भारतीय खेळाडूंना यामुळे संधी मिळू शकते. झिंगनच्या यशासाठी मी प्रार्थना करेन, तो नक्कीच तिथे चमकेल अशी खात्री आहे.’

एकूण पाचवा भारतीय फुटबॉलपटूयुरोपियन फुटबॉल लिगमध्ये करारबद्ध होणारा झिंगन हा एकूण पाचवा भारतीय फुटबॉल पटू ठरला. झिंगनच्या आधी भारताचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया, सुब्रत पॉल, सुनील छेत्री आणि गुरप्रीत सिंग हेही युरोपियन व्यावसायिक लिगमध्ये करारबद्ध झाले होते. यानंतर असा करार मिळवणारा झिंगन पाचवा भारतीय पुरुष फुटबॉलपटू ठरला.

टॅग्स :Footballफुटबॉल