रोनाल्डोच्या मदकार्याच्या चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 04:07 AM2020-03-16T04:07:47+5:302020-03-16T04:09:06+5:30

पोतुर्गालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपली सगळी हॉटेल्स रुग्णालयात बदलण्याचा निर्णय घेत रुग्णांच्या उपचाराचा खर्चही करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र...

Discussion on Ronaldo's contribution for Corona patients | रोनाल्डोच्या मदकार्याच्या चर्चेला उधाण

रोनाल्डोच्या मदकार्याच्या चर्चेला उधाण

Next

नवी दिल्ली - करोना आजाराशी लढण्यासाठी जगभरातील क्रीडा क्षेत्र एकवटले आहे. त्यात पोतुर्गालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपली सगळी हॉटेल्स रुग्णालयात बदलण्याचा निर्णय घेत रुग्णांच्या उपचाराचा खर्चही करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या.
पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोने या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार केले जातील असे सांगितले. दिवसभर रोनाल्डोच्या या निर्णयाचे वृत्त कोरोना विषाणूपेक्षाही अधिक वेगाने जगभरात पसरले. डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचा खर्चही रोनाल्डो करणार असल्याचे वृत्त जगभरातील प्रसारमाध्यंमांनी दिले. मात्र काही तासांनीच हे वृत्त खोटे असल्याचे एका इंग्रजी वृत्तसंकेस्थळाने म्हटले. त्यामुळे रोनाल्डोच्या मदतकार्याच्या चर्चांना उधाण आले. क्रीडा पत्रकार क्रिस्तोफ टेररने रोनाल्डो मोफत उपचार करणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केल्यानंतर रोनाल्डोच्या मदतीची सर्वप्रथम बातमी देणारे मार्का वृत्तपत्र व युवेंटसच्या संकेस्थळाने ही बातमी मागे घेतली. (वृत्तसंस्था)

Web Title: Discussion on Ronaldo's contribution for Corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.